बीड(रिपोर्टर): प्रत्येक वर्ष कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील आणि शहरातील नागरीकांना रानभाज्यांचा महत्व पटावं, त्यांची ओळख व्हावी आणि आहारातील त्यांचे विशेष स्थान या भूमिकेतून हा रानभाज्या महोत्सव घेतला जातो.
याही वर्षी सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणात कृषी विभागाच्या वतीने या भाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहेत. यामुळे दूर्मिळ होत चाललेल्या बरमडा, कुरुडू, सराटे यासह अनेक रानभाज्या या महोत्सवात आहेत. याचे उद्घाटन आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, बाबासाहेब जेजुरकर, अप्पर लिउज्हाधिकारी विरेंद्र कुलकर्णी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. साळुंके, बीडीओ अनुरुद्र सानप, तालुका कृषी अधिकारी गंडे, कृषी विकास अधिकारी करांडे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी देशमुखसह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थितांना त्यांनी रानभाज्यांचे महत्व पटवून दिले.