Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडभरदिवसा शिक्षीकेच्या गळ्यातील गंठण पळविले

भरदिवसा शिक्षीकेच्या गळ्यातील गंठण पळविले


बीड शहरात घडलेली घटना
बीड (रिपोर्टर)- शाळा सुटल्यानंतर पायी घरी जात असलेल्या शिक्षीकेला दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी दुचाकी आडवी लावून गळ्यातील साडेचार तोळ्याचे गंठण हिसकावून पळ काढला. या प्रकरणी शिक्षिकेने शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे.

विवेकानंद शाळेत असलेल्या तोळण जगन्नाथ करांडे (वय 50) या मंगळवारी शाळा सुटल्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान आपल्या घरी पायी सुवर्ण नगरी कॉलनी पालवण चौक येथे जात असताना सुवर्णनगरी कॉलनीच्या कॉर्नरवर अज्ञात दोघे जण मोटारसायकलवरून त्यांच्या जवळ आले व गळ्यातील साडेचार तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढला. या प्रकरणी करांडे यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. गुरले हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!