अजितदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है,
संडे टू मंडे धनंजय मुंडेच्या घोषणांनी बीड दणाणले
अजितदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है,
संडे टू मंडे धनंजय मुंडेच्या घोषणांनी बीड दणाणले
न भुतो न भवियती सभा
बीड (रिपोर्टर): सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची अन् दुष्काळ मिटवण्याची, असे घोषवाक्य घेत कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या देखरेखीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाची जाहीर सभा आज होत असून या सभेसाठी जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने नव्हेतर लाखोंच्या संख्येने अबालवृद्ध बीड शहरात डेरेदाखल होताना दिसून येत आहेत. कडकणारी हलगी, ढोल ताशा, टाळमृदंग अन् अजित पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, संडे टू मंडे धनंजय मुंडे अशा गगनभेदी घोषणा देत कार्यकर्ते, नागरीक, शेतकरी, कष्टकरी सभास्थळाकडे कुच करताना दिसून येत आहेत. प्रचंड उत्साह कार्यकर्त्यात पहावयास मिळत आहे तर बीड जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आणि दुष्काळ हटवण्याबाबत जिल्ह्याचा नागरीक या व्यासपीठाकडे आशावादाने लक्ष ठेवून आहे. दस्तुरखुद्द धनंजय मुंडे हे सकाळपासून सभेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष ठेवून आहेत. शहरातला प्रत्येक रस्ता हा माणसांनी फुलल्याचे दिसून येत आहे. या सर्व घडामोडीतून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाला भरतीचे उधान आले आहे. तर अजित दादांच्या सभेसाठी जनसैलाब उसळला आहे.
छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर न भुतो न भविष्यती अशी सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होत आहे. या सभेसाठी अर्धे मंत्रिमंडळ उपस्थिती दर्शवत असून सभास्थळी दुपारी बारा वाजल्यापासून जिल्हाभरातील हजारो नव्हे तर लाखो नागरीकांसह कार्यकर्त्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. भव्यदिव्य सभामंडपात जागा मिळावी यासाठी आधीच लोक जाऊन बसत आहेत. सभेचे व्यासपीठ फुलांनी सजवण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महत्वाचे खाते असलेले अर्धे मंत्री मंडळ बीडमध्ये डेरेदाखल होऊ लागले आहेत. शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर जनैसलाब पहावयास मिळत आहे. कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे हे सकाळपासून बीडमध्ये डेरेदाखल असून त्यांनी बारा वाजण्याच्या सुमारास सभास्थळी येऊन व्यवस्थापनाची पाहणी केली. कार्यकर्त्यांना सूचना दिल्या, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला भरतीचे उधान आल्याचे पाहून कार्यकर्त्यांनी संडे टू मंडे धनंजय मुंडे अशा घोषणा दिल्या. बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, वडवणी, धारूर या तालुक्यातून हजारोंच्या संख्येने लोक बीडमध्ये डेरेदाखल होत आहेत. अन्य मोठ्या आणि छोट्या गावातूनही लोक उपमुख्यमंत्री अजित पवारांना ऐकण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाकडे कुच करत आहेत. प्रचंड उत्साह, गगनभेदी घोषणांनी सभास्थळ दणाणून गेले आहे.