Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईम’त्या’ तिघांना सोडण्यासाठी भाजपा नेत्यांचे फोन समीर वानखेडेंनी उत्तर द्यावे’-नवाब मलिक

’त्या’ तिघांना सोडण्यासाठी भाजपा नेत्यांचे फोन समीर वानखेडेंनी उत्तर द्यावे’-नवाब मलिक


मुंबई (रिपोर्टर)- ’क्रूज पार्टीवरील छापा हा बनावट असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ’ज्या दिवशी क्रूझवर एनसीबीने छापे टाकले त्यावेळी समीर वानखेडे यांनी 8 ते 10 लोकांना ताब्यात घेतलं असं म्हटलं होतं. हे बेजबाबदार वक्तव्य आहे. एकूण अकरा लोकांना ताब्यात घेतलं होतं आणि नंतर आठ लोकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या,’ असा खळबळजनक खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी काही फोटो व व्हिडिओ दाखवत एनसीबवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तसंच, या प्रकरणात भाजप पदधिकार्‍यांसह तीन जणांची नावांचा गौप्यस्फोट केला आहे. ’एनसीबीने ताब्यात घेतलेल्या 11 जणांमध्ये रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला या तिघांना सोडण्यात आलं. या तिघांना का सोडण्यात आलं?, रिषभ सचदेव हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे नातेवाईक आहेत,’ असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
’1300 लोक सहभागी असलेल्या क्रूझवर छापा टाकून फक्त 11 जणांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली. मात्र, ज्या तीन लोकांना तुम्ही सोडलं, त्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले. भाजपच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला, अशी माहिती आमच्याकडे आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ’दिल्ली ते मुंबईतील भाजप नेत्यांनी फोन केले. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्यानं त्यांच्या नातेवाईकांना सोडलं. या तिघांना का सोडलं या प्रश्नाचे उत्तर समीर वानखेडेंनी द्यावे,’ अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.’हा विषय गंभीर झाला आहे. काही ठराविक लोकांना ताब्यात घेतला जातोय एनसीबीचा वापर करुन भाजपा महाराष्ट्र सरकाला बदनाम करतेय. याविषयी चौकशी करावी,’ अशी मागणी नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!