Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईआ. लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला विविध पक्ष संघटनांसह शेतकर्‍यांचा जाहीर पाठिंबा

आ. लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला विविध पक्ष संघटनांसह शेतकर्‍यांचा जाहीर पाठिंबा


गेवराई (रिपोर्टर) राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जुलै 2021 मध्ये नागरीकांच्या मालमत्तेसह पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्यात आली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयात बीड जिल्हा सोडता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. यामध्ये एकूण 365 कोटी 67 लाख रूपयांचा निधी विभागीय स्तरावर देण्यात आला. मात्र सत्ताधारी पुढार्‍यांच्या दुर्लक्षामुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना काहीच मदत न मिळाल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत असून याच धर्तीवर अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय आंदोलनाचा लढा उभारण्यात येणार आसून या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी दि.09 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले शॉपिंग सेंटर (तापडिया हॉल) नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला तालुक्यातील सर्व सामाजिक पक्ष, संघटना, शेतकरी चळवळीतील नेते, पदाधिकारी यांच्यासह शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दरम्यान या बैठकीत उपस्थित पक्ष, संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त करत आ.पवार यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा असून ते ठरवतील त्या आंदोलनात आम्ही सहभागी होऊन या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी यामध्ये सहभागी होऊ असा निर्णय घेण्यात आला. तर सध्याचे आघाडी सरकारला मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे घेणं देणं नसून आता या सरकारला जागे करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आ.लक्ष्मण पवार यांनी पुढाकार घेतला असून आम्ही शेवटपर्यंत या आंदोलनात सहभागी असल्याची भावना उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. यावेळी आ.लक्ष्मण पवार, मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, किसान संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम चोपडे, रासपचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग थडके, शेतकरी संघटनेचे रामेश्वर गाडे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, वंचित बहुजन आघाडीचे पप्पू गायकवाड, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जे.डी. शहा, देविदास खरात, सुरेश पोतदार, प्रा.शाम कुंड, शेतकरी संघटनेचे नेते हतोटे, सभापती दीपक सुरवसे, जि.प.सदस्य प्रल्हाद माने, मनसे तालुकाध्यक्ष जयदीप औटी, कोळगावचे सरपंच उद्धव रासकर, पं. स.सदस्य संजय जाधव, शेतकरी किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष देविदास फलके यांच्यासह राजकीय, सामाजिक, पक्ष संघटनांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकर्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!