परळी (रिपोर्टर): परळी तालुक्यातील वैजवाडी येथील शेतकरी बालाजी ज्ञानोबा ढाकणे या शेतकर्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि.30 ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
परळीपासुन जवळच असलेल्या वैजवाडी येथील शेतकरी बालाजी ढाकणे वय 45 यांना दोन एकर जमीन असुन त्यांनी शेतीवर कर्ज घेतलेले आहे. सध्या पाऊस नसल्याने सोयाबीन पीक वळत असल्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होते.यातच बुधवार दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा मृतदेह शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला.घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पो. ह.तोटेवाड,पो. ह. घरत,चालक गित्ते यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला.आत्महत्याग्रस्त शेतकरी ढाकणे यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले,1 मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे.