Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडजि.प.च्या 90 प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती

जि.प.च्या 90 प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती


बीड (रिपोर्टर):- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातून आपल्या सेवेची विशिष्ट वर्षे पुर्ण केल्यानंतर या शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती दिली जाते. जिल्हा परिषदेच्या 90 प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी बढती देण्यात आदेश नुकतेच निर्गमीत करण्यात येत आहेत.

गेल्या तीन महिन्यापासून शिक्षण विभागाने कोणते शिक्षक मुख्याध्यापक पदाला पात्र आहेत याबाबतची यादी प्रसिद्ध करून यावर अक्षेप नोंदवले होते. जातनिहाय आरक्षण, बिंदू नामावली, वयाची विशिष्ट वर्षे झालेली सेवा या बाबी ग्राह्य धरून काल शिक्षणाधिकारी कुलकर्णी आणि 11 तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षण सभापती सोनवणे यांच्या कक्षामध्ये या बाबतची प्रक्रिया पुर्ण करून या शिक्षकांना मुख्याध्यापक पदी बढती देण्या संदर्भात कारवाई पुर्ण केलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची या संचिकेवर आज सही होवून ज्या शिक्षकांना बढती मिळाली आहे त्यांचे आदेश निर्गमीत करण्यात येतील. रिक्त झालेल्या या शिक्षकांच्या जागेवर अंतर जिल्हा बदलीने बाहेरून आलेल्या शिक्षकांना सामावून घेतले जाईल अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

Most Popular

error: Content is protected !!