Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडडॉ.साबळे साहेब, आपल्या जिल्हा रूग्णालयातत चालले काय? ओपीडी विभागात तब्बल एक तासाभराने...

डॉ.साबळे साहेब, आपल्या जिल्हा रूग्णालयातत चालले काय? ओपीडी विभागात तब्बल एक तासाभराने डॉ.देशमुख उशिरा येवून पेशंटशी करतात अरेरावी

बीड (रिपोर्टर):- जिल्हा रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.साबळे यांनी पदभार स्विकारल्यापासून दवाखान्याला शिस्त लावल्याचे बोलले जात असतांनाच बाह्य रूग्णालयामध्ये कर्तव्यावर असलेले डॉक्टर कधीच वेळेवर येतच नाहीत. तर दुसरीकडे अस्थिरोग विभागाचे डॉ.सचिन देशमुख हे चक्क एक तास उशिरा येवून आलेल्या रूग्णांना दारूच्या नशेत अरेरावीच्या भाषेत बोलतात. डॉ.साबळे हे तुमच्या दवाखान्यात चालले आहे काय? वरून कीर्तन आतून तमाशा तर नव्हे ना?


काल दुपारी 4.30 वाजता बाह्य रूग्णालयाची ओपीडी सुरू होण्याची वेळ असतांना डॉ.सचिन देशमुख चक्क ओपीडी बंद होण्याच्या पंधरा मिनिट अगोदर आपल्या ओपीडी विभागात आले. तोपर्यंत अस्थिरोग विभागात तपासण्यासाठी आलेले रूग्ण निवासी डॉ.राठोड यांच्या कक्षात मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यामुळे डॉ. राठोड यांनी आपल्या शिपायामार्फत दोन वेळेस फोन केल्यानंतर चक्क डुलत-डुलत सव्वा पाचच्या दरम्यान डॉ.सचिन देशमुख आपल्या अस्थिरोग विभागात दाखल झाले. आल्याआल्याच त्यांनी आपल्या कॅबिनसमोरच्या शिपायाला झपाझप झापत इथुन पुढे माझ्याकडे तपासायला आलेल्या पेशंटला मी येईपर्यंत वाट बघायची सांगायची. त्याला वाट बघता येत नसेल तर पुन्हा त्याला माझ्याकडे येवू द्यायचे नाही आणि दवाखान्यात इथुन पुढे माझ्या बाबतीत चौकशी केली तर डॉ.सचिन देशमुख मेला आहे असे चक्क सांग असे म्हणत नशेतच आपल्या खुर्चीवर बसत समोर असलेल्या पेशंटला आरेरावी करत तपासणी केली. या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना दुरध्वनीवर झालेला प्रकार सांगितला असता ते म्हणाले की, आरएमओ यांना याबाबत सांगा. आरएमओ म्हणतात डॉ.देशमुखचा प्रकार तुम्हीच सिव्हील सर्जनच्या कानावर घाला. डॉ.साबळे आपण नुकतीच विभागीय आयुक्तांची शब्बासकी मिळवली. आल्यापासून आपण चांगलेही काम केल्याचा गवगव आहे. मात्र आपल्या जिल्हा रूग्णालयात वरून कीर्तन आतून तमाशा तर नाही ना?

Most Popular

error: Content is protected !!