मराठवाड्यात 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान पाऊस पडणार
बीड (रिपोर्टर): सुमारे महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर राज्यभरात आता पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. राज्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने आता आणखी आठवडाभर राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शुक्रवारपासून राज्यात सर्वदूर पावसाचे हजेरी लावली आहे.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. गेल्या 24 तासात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. येत्या 4 दिवसात त्यातच 48 ते 72 तासांत राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज हवामना खात्याने वर्तवला आहे.काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.
राज्यात आता पुन्हा मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत शनिवारी मुसळधार ते मध्यम पावसाची नोंद झाली. आगामी 4 दिवसांसाठी राज्यात सर्वत्र जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्रात 3 आणि 4 सप्टेंबर, मराठवाडयत 3 ते 5 सप्टेंबर अणि विदर्भात 3 ते 6 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात त्या तुलनेत कमी पाऊस राहील, असा अंदाज वरत्वण्यात आला आहे. शनिवारी दिवसभरात कोल्हापूर, रायगड, सांगली, पुणे या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला.