आम्ही नाव नाही पंतप्रधान बदलणार -उद्धव ठाकरेंचा घणाघात
जळगाव (रिपोर्टर)- पारतंत्र्यामध्ये जालीयनवाला बाग घडले होते
तसे आता जालनावाला घडले, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत जायला वेळ आहे परंतु उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांना भेटायला वेळ नाही. सराटे अंतरवलीत जो अमानूष लाठीहल्ला झाला त्या जखमींना भेटायला वेळ नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ‘आम्ही नाव बदलणार नाही तर पंतप्रधान बदलणार’ असल्याचे म्हटले. केंद्र सरकार डगमगायला लागले आहे, केंद्र सरकार हलायला लागले आहे. पोलादी पुरुष केवळ नावाचे नाही तर कामाचे असायला हवेत. नाव लावून कोणी
काही करू शकते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ते जळगाव येथे पुतळ्याच्या उद्घाटनाला आले असता जाहीर सभेत बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण पण त्याला होर्डिंग लावले, मी शिवसेनेला कमळाबाईंची पालखी वाहायला देणार नाही. 25 वर्षं भाजपसोबत राहून शिवसेनेचा भाजप झाला नाही, तर शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही. इंडियाची बैठक झाल्यावर शिवसेनाप्रमुखांचा फोटो असल्याचे बॅनर लागले होते. इंडियाच्या बैठकीचे अध्यक्षपद आपल्या शिवसेनेला दिले होते. देशातले सगळे मोठे नेते तिथे आले होते. माझा पक्ष चोरला तरी मला तिथे किंमत होती. ती किंमत तुमची आहे. माझा जीव तुमच्यासाठी आणि देशासाठी जळतोय. आणि जागे करण्याचे काम वंशपरंपरागत आले आहे, ते मी करतोय. उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाचे नेतृत्व ही फार मोठी गोष्ट आहे. सत्ता आली काय गेली काय, आशीर्वाद देणारे तुम्ही आहात. कारण मी तसे केले नसते तर शिवरायांनाच काय तर हिंदुहृदयसम्राटांना तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलो नसतो. माझ्या मंत्रिमंडळातही जेव्हा मंत्र्यावर आरोप झाले तेव्हा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला सांगितले. तुम्हाला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. महिलेला देवता मानणारे शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणारा मंत्री तुमच्या मांडीला मांडी लावून बसतोय, उद्धव ठाकरे म्हणाले की, गृहमंत्री तिथे राहून आले तरी कारवाईचं पाऊल उचललेलं नाही. या लोकांना शिवराय आणि सरदार पटेलांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले त्यावर पंतप्रधान चकार शब्द बोलत नाहीत. तिथे कोणत्या भाषेत बोललात, तेही सांगा. त्याबद्दल काही नाही फक्त फोटो काढून चमकोगिरी करायची. हे गद्दार तिकडे जाऊन काय बोलणार? जो बायडनशी बोलणार की ऋषी सुनक यांच्याशी बोललात का. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान आज जी 20मध्ये लगबग करताहेत, आपले बेकायदा मुख्यमंत्रीही तिथे गेलेत. मणिपूरमध्ये खुलेआम विटंबना झाली, पण तिथे कुणी काही बोलायला तयार नाही. हे नावाचे लोहपुरुष आहेत, तकलादू पुरुष. रझाकाराच्या अत्याचारापासून मराठवाडा सोडवला म्हणून ते पोलादी पुरुष सगळीकडे लूट करायची आणि आदर्श म्हणून मिरवायचे हे चाळे असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुळात कर्तृत्व काहीही नाही. तुम्ही सरदार पटेलांचा कितीही उंच पुतळा बांधा, त्यांच्या कर्तृत्वाची उंची गाठणार नाही. केले काय, तर चोरी. आता माझ्या वडिलांना चोरायला निघालेत. पटेलांचा उंच पुतळा मध्यंतरी उभारण्यात आला. भाजपने आणि त्यांच्या मातृसंस्थेने आदर्श व्यक्तिमत्त्वं उभी केली नाहीत. दोन पुतळ्यांचे (पान 7 वर)
अनावरण आज केलं. त्यांना लोहपुरुष म्हणतात. आता ही तरुण पिढी उभी राहिली आहे आणि ती जळगावला पुढे नेते. ही मोठी माणसे नाहीत, तुम्हीच त्यांना मोठे केले आहे. ही माणसे मोठी झाली आणि गॅसचे फुगे तरंगायला लागले. त्यांना टाचणी मारायचं काम तुम्हाला करायचे आहे. कारण एकेकाळी जळगावने प्रगतीचा वेग पकडला होता. शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना तुम्ही उमेदवार कोण हे न बघता मतदान केलं. कुलभूषण, महापौर यांचे कौतुक करतो. साहजिकच आहे. या सभेला तुम्ही वचनपूर्ती सभा नाव दिले. कारण शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे की, एकदा शब्द दिला तर प्राण गेला तरी बेहत्तर, शब्द पडू द्यायचा नाही. मी तेव्हा या पुतळ्याच्या अनावरणाला येईन असे वचन दिले होते. मी वचन दिले तर विसरत नाही. काही काळापूर्वी मी पाचोर्याला आलो होतो. तेव्हा शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजनाला मी आलो होतो. ते वाटताहेत आणि माणसे जमवताहेत. पण, मी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद देतो. अशा अनेक सभा होतात, त्याला माणसं भाड्याने आणावी लागतात. त्या भाड्याची वेळ झाली की माणसे उठून जातात.