बीड (रिपोर्टर) ‘महावितरण कार्यालयातून बोलतोय’, ‘तुम्ही मागिल महिन्याचे लाईट बील भरले नाही’, ‘त्यामुळे तुमची लाईट येत्या 24 तासात कट होईल’ असे फेक एसएमएस आणि कॉल बीड शहरासह जिल्ह्यातील अनेक नागरिकांना येत आहे. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते नागरिकांना सहज गंडा घालतात अन् नागरिकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये परस्पर काडून घेतले आज आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहत अशा एसएमएस आणि फेक कॉलला प्रतिसाद न देता आपल्या काही अडचणी असतील तर थेट नजिकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.
गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक नागरिकांची भामट्यांनी फसवणूक केली आहे. बीड शहरातील शिवाजीनगर भागात राहणार्या अतुल श्रीनिवास जाजु (वय 42 वर्ष, रा. सारडा नगरी, बीड) यांना काल दि. 23 जून रोजी सकाळी एका भामट्याने जाजु यांच्या व्हॅट् अॅप वर एसएमएस करुन ‘तुमचे लाईट कनेकश्न बिल न भरल्यामुळे बंद करण्यात येईल. त्यांनतर पुन्हा एका अनओळखी मोबाई नंबर वरुन कॉल करुन तीच माहिती देण्यात आली. अन् त्यांच्याशी संवाद साधून एक अॅप्लीकेशन मोबाईल मध्ये घेण्यास सांगितले. त्यांनी त्या अनओळखी इसमावर विश्वास ठेवून त्याला प्रतिसाद दिल्यामुळे जाजु यांच्या बँक खात्यातून 99 हजार 998 रुपये परस्पर काडून घेण्यात आले. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाजु यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.