Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeराजकारणकृषी कायद्याबाबत समिती स्थापन, शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय घेणार : बाळासाहेब थोरात

कृषी कायद्याबाबत समिती स्थापन, शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय घेणार : बाळासाहेब थोरात


मुंबई (रिपोर्टर)- कृषी कायद्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. आम्ही त्यावर चर्चा करुन शेतकर्‍यांच्या बाजूचे निर्णय घेणार आहेत, असं राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सोबतच वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद नसल्याचंही ते म्हणाले.


बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यातील दोष आम्ही दाखवत आहोत. हे कायदे नफोखोरांसाठीच बनवले आहेत. या कायद्याविरोधात सहकारी पक्ष आमच्यासोबत आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. आम्ही त्यावर चर्चा करुन शेतकर्‍यांच्या बाजूचे निर्णय घेणार आहेत.


तर वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद आहे का याविषयी ते म्हणाले की, वाढीव वीज बिलाबाबत बैठक झाली होती. त्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी नितीन राऊतांनी केलेल्या घोषणेवर भाष्य केलं असावं. नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली, ती आमची चूक होती, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. त्याविषयी ’माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात नितीन राऊत यांना विचारण करण्यात आली. तेव्हा वीज बिल माफी माझं व्यक्तिगत मत नव्हतंच, तो सरकारचा निर्णय होता, असं ते म्हणाले. यावरुन काँग्रेसमध्ये विसंवाद आहे का, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांनाच याविषयी विचारलं. ते म्हणाले की, कोरोनाच्या आधीही आमचं व्हिजन 100 युनिटच्या आत असलेल्यांना मदत करण्याबाबतचा विषय होता. कोरोनाच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलात मदत करण्याची आमची चर्चा होती. वीज बिलाबाबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना माहित नव्हतं. त्यामुळेच त्यांनी ते वक्तव्य केलं. काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे की सर्वांसमोर मोकळेपणाने बोलतो.

Most Popular

error: Content is protected !!