बीड (रिपोर्टर): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात शांतत कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य आणि अनेक गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आणि राष्ट्रीय महामार्गावर जे अनाधिकृत बॅनर लावण्यात आलेले आहेत ते तात्काळ हटवावेत आणि शहरातील खड्डे बुझवावेत, अशी सर्वमुखी मागणी करण्यात आली. ही बैठक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या अध्यक्षतेखाली चालू असून पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गेल्या सहा महिन्यांपासून बीड शहरामध्ये सर्वच कार्यक्रमांचे बॅनरयुद्ध सुरू आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून शहरातील औरंगाबाद-सोलापूर मार्ग सोडला तर नगर रोड आणि धोंडीपुरा व इतर मार्गात सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे जिल्हा प्राासनाने गंभीर दखल घेऊन हे बॅनर तात्काळ हटवावेत आणि गणेशोत्सवासह इतर सणांच्या पूर्वी सर्व खड्डे बुझवावेत, अशी मागणी सर्वांच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे शहरातील कचरा ढिग, खड्डे बॅनर हटतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.