Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडवडवणीशेतकरी आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना ! आज पुन्हा खळवट लिमगांवात घटना

शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना ! आज पुन्हा खळवट लिमगांवात घटना

आज पुन्हा खळवट लिमगांवात घटना २४ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेतला , ५ दिवसात ३ आत्महत्या वडवणी तालुका घटनेनी सून्न

भैय्यासाहेब तांगडे l वडवणी 


 शेतातील सततची नापिक आणि निसर्गाची अवकृपा यात घेतलेले कर्ज कसे फेडायचे म्हणुन आलेले नैराश्य आणि यातून झालेल्या आत्महत्या या घटनेन अवघा वडवणी तालुका सुन्न झाला असून ५ दिवसात ३ तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच धक्कादयाक वास्तव समोर आले आहे.आज पुन्हा खळवट लिमगाव येथील २४ वर्षीय आविवाहित तरुण शेतकऱ्याने स्व;ताच्या शेतात बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

      ज्ञानेश्वर नामदेव खराडे वय – २४ वर्ष या आविवाहित तरुण शेतकऱ्याने आज पहाटे स्वताच्याच जवळ असणाऱ्या शेतात बोरीच्या झाडाला दाव्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून शेतातील सततची नापिकी आणि निसर्गाची अवकृपा यात खाजगी सावकारासह सरकारी बँकेचे घेतलेल कर्ज कशाच्या पायी फेडायच,आई-वडील आणि भावाचा इंथून पुढचा उदारनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न सतत मनी छळत होता.आणि याचेच नैरश्य आले असल्याने पहाटे घराच्यांना कुणालाच न सांगता शेतात जावून बोरीच्या झाडाला गळफास घेऊन ज्ञानेश्वर खराडे या अविवाहित तरुण शेतकऱ्याने लाखमोलाच जिवन संपविले आहे.तर अशाच दोन घटना मागील पाच दिवसाच्या कालखंडात घडल्या आहेत.यात दि.२० संप्टेबर २०२१ रोजी खळवट लिमगाव येथील ३४ वर्षीय सिध्देश्वर धर्मराज फरताडे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली तर कवडगांव येथील ३५ वर्षीय शेतकरी दिलीप शेषेराव शेजाळ या शेतकऱ्याने परवा दि.२३ संप्टेबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विष पाषण केले.घरातील मंडळीना दिसताच त्यांना शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आसता काल सकाळी ७ वाजता शेजाळ यांनी देखील जगाचा निरोप घेतला आणि हि चित्ता शांत होते कि नाही ती आज पुन्हा ज्ञानेश्वर फरताडे या तरुण शेतकऱ्यानी मरणाला जवळ केले असून खळवट लिमगांव येथील २ तर कवडगांव येथील १ अशा एकुण ३ शेतकऱ्यांनी ५ दिवसांत आत्महत्या करुन अनमोल अशा जिवनाची जिवनयात्रेला पुर्वविराम दिला आहे. या घटनेन वडवणी तालुका सुन्ना झाला आहे.                सदरील घटनेच वास्तव मानवी जिवनाला धक्कादयाक असून मागील काळात झालेली प्रंचड आतिवृष्टी हातातून गेलल पिक आणि गेल्या वर्षीचा न मिळालेला पिक विमा यातून कोलमोडलेल शेतकऱ्याच आर्थिक बजेट या कारणाने तिन्हीही शेतकऱ्याने मरणाला कवटाळले आहे.तर आतिवृष्टी झाल्यापासून ते आज पर्यत बीड जिल्ह्यातील सर्वात कमी दिवसांत जास्त आत्महत्या असणार तालुका म्हणून वडवणीचा उल्लेख होऊ शकतो.यामुळे सरकार म्हणून माय-बाप या शेतकरी राजाच्या पदरात नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी होत असून या आत्महत्या करण्याच सत्र थांबता थांबेना ! असे यावरून दिसून येत आहे.** तिघे हि अल्पभूधारक शेतकरी ** खळवट लिमगाव येथील मयत शेतकरी सिध्देश्वर धर्मराज फरताडे यांना अडीच एकर शेती तर आज मयत झालेल्या याच गांवातील ज्ञानेश्वर नामदेव खराडे यांना दोन एकर शेती तर काल मयत झालेले शेतकरी यांना तर अवघी आर्धा एकर शेती होती.तर मयत झालेले तिन हि शेतकरी वडवणी तालुक्यातील अल्पभूधारक आहेत.असे सांगण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!