बीड (रिपोर्टर) अंबाजोगाई शहरातील खडकपुरा येथील एका नोकरदाराचे भर दिवसा घर फोडून घरातील सहा तोळ्याचे सोन्याचे दागिणे लंपास केल्याची घटना काल दुपारी घडली.
चंद्रकांत गणपतअप्पा तोडकर (वय 54, रा. खडकपुरा, अांबजोगाई) यांनी अंबाजोगाई शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 23 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी चार दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कंपाऊंड वॉलवरुन उडी मारुन घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्याच्या तीन अंगठ्या प्रति ग्रॉप पाच प्रमाणे 15 ग्रॉम, दिड तोळयाचे सोन्याचे गंठन, दोन तोळ्याची सोन्याची चैन, एक तोळ्याचे कानातील, चांदीचे दोन गणपती, चांदीचे दोन करांडे असा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.