शिरूर कासार (रिपोर्टर)- तालुक्यातील पाडळी येथे पाच वर्षांपूर्वी पेयजल नावाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती मागील पाच वर्षापासून या योजनेचे काम सुरू आहे योजनेसाठी मंजूर असलेला निधी गुत्तेदार व अधिकारी यांनी संगणमताने काढून घेतलेला आहे परंतु अद्यापही योजना सुरू झालेली नाही योजना अपूर्ण असतानाही योजनेची देयके चलणार्या गुत्तेदार व अधिकार्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पाडळी येथील नवनाथ सानप यांनी केली आहे.
मंजूर पेजल योजनेतून पाडळी येथील इंगळे वस्ती घुगे वस्ती व नागर्याच्या वाडी या ठिकाणी या योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार होता ही योजना पूर्ण करण्यासाठी संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांनी तब्बल पाच वर्षाचा कालावधी लावला परंतु या पाच वर्षाच्या कालखंडानंतरही ही योजना पूर्ववत सुरू झाली नाही यामुळे नागरिक पाणी मिळवण्यापासून दूर राहिलेले आहेत विहीर पाईपलाईन केवळ या गोष्टीचा देखावा करून लाखो रुपयाचे बोगस बिले उचलले असल्याचे तक्रार पाडळी येथील देवेंद्र प्रतिष्ठानचे संचालक नवनाथ सानप यांनी मुख्य कार्य अधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित प्रकरणात गुत्तेदार व अधिकारी यांच्या चौकशीची मागणी केलेली आहे.
ग्रामपंचायत कडून योजना अधिग्रहित नाही
गावाला मंजूर झालेली पेयजल योजना अद्याप पूर्ण झालेली नसून ग्रामपंचायत कडून ही योजना अधिग्रहित केलेली नाही याबाबतीत ग्रामपंचायत मध्ये कसलेही पुरावे नसून योजना अद्याप कार्यान्वित झालेली नसल्याचे दिसून येत आहे
खेडकर , ग्रामसेवक पाडळी