Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमगुट्टेवाडीत गांज्याच्या शेतीवर पोलिसांचा छापा 4 लाखांचा एक क्विंटल गांजा जप्त

गुट्टेवाडीत गांज्याच्या शेतीवर पोलिसांचा छापा 4 लाखांचा एक क्विंटल गांजा जप्त


परळी (रिपोर्टर)- राज्यभरात अंमली पदार्थावरून रणकंद उठलेले असतानाच आज परळी तालुक्यातील एका शेतकर्‍याच्या शेतात पोलिसांनी छापा मारून स्वत:च्या फायद्यासाठी शेतात लावलेल्या गांज्याच्या झाडावर छापा मारून 7 गांज्याचे झाड अंदाजीत वजन एक क्विंटल जप्त केले असून बाजारामध्ये याची किंमत 4 लाख 28 हजार एवढी आहे. सदरची कारवाई ही परळी ग्रामीण पोलिसांनी गुट्टेवाडी या गावात केली.

परळी तालुक्यातील गुट्टेवाडी येथील भाऊसाहेब दत्ता गुट्टे यांच्या मालकीच्या तुरीच्या शेतामध्ये गांज्याचे उत्पादन केले जात असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी आज गुट्टे यांच्या शेतावर छापा मारला. शेतातील तुरीच्या सर्‍यांमध्ये सात गांज्याचे झाड आढळून आले. याचे मातीसह वजन केले असता एक क्विंटल 7 किलो रभले असून सदरील गांज्याची किंमत 4 लाख 28 हजार एवढी असल्याचे सांगण्यात येते. सदरची कारवाई सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गुट्टेवाडी शिवारातील गट नं. 715 मध्ये करण्यात आली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मारुती श्रीराम मुंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब गुट्टे यांच्या विरोधात गु.र.नं. 250/21 कलम 20 एनडीपीसी अ‍ॅक्टनुसारर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!