बीड (रिपोर्टर)- गरात एकटी असलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला विवाहित 18 वर्षीय तरुणाने चॉकलेटचे आमिष दाखवून घरात घुसून विनयभंग केला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाा असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 21 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना आरोपी समाधान मुक्तीराम मेखले (वय 28 वर्षे) हा विवाहित तरुण तिच्या घरात घुसला. चॉकलेटचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी काल बीड ग्रामीण पोलिसात आरोपीविरोधात कलम 354, 452 भा.दं.वि.सह कलम 8, बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.