Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडकोरोनानंतरची पहिली दिवाळी जोरात बाजारपेठात गर्दी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तालीम

कोरोनानंतरची पहिली दिवाळी जोरात बाजारपेठात गर्दी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तालीम


पुढार्‍यांच्या घरी वर्दी आणि गर्दी, अनेकांकडून भेटीगाठीसाठी फराळाचा निमित्त

बीड (रिपोर्टर)- गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या समुहसंसर्गाने सर्वच सणांवर सावट आले होते. कोरोनानंतरची पहिली दिवाळी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यातहेतु जनतेत प्रचंड उत्साह दिसून येत असून बाजारपेठा गर्दीने फुलून गेले आहेत. तर दुसरीकडे नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रंगीत तालीम करण्याहेतु पुढार्‍यांनी दिवाळीचं निमित्त साधून भेटीगाठीवर भर देण्यासाठी फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे पुढार्‍यांच्या घरी वर्दी देणारे आणि गर्दी करणारे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.


२०१९ च्या एप्रिल-मे दरम्यान देशात आलेला कोरोना बीड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून अक्षरश: तळ ठोकून होता. सातत्याने पडणारे लॉकडाऊन आणि कोरोनाची भीती यामुळे गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात कुठलेच सणोत्सव समुहाने साजरे करता आले नाहीत. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोरोनानंतरची पहिली दिवाळी बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसून येत आहे. कालपासून दिवाळीला सुरुवात झाली असून उद्या लक्ष्मीपुजन आहे. त्यानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. सणांचा राजा म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते, या सणाला देशभरात अनन्यसाधारण महत्व आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे दिवाळीचा सण हा समुहाने साजरा करता आला नाही. यावर्षी मात्र दिवाळी सणाचे निमित्त साधून नागरिकांनी भेटीगाठीवर भर दिला आहे तर या दिवाळीच्या सणाच्या संधीचं सोनं करण्यासाठी पुढारीही सरसावले आहेत. दोन वर्षांपासून संपर्कात नसलेले पुढारी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रंगीत तालीमीसाठी दिवाळीचा मुहूर्त या लोकांनी साधला असून त्यानिमित्ताने पुढार्‍यांनी फराळाच्या कार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!