प्रशासकीय पातळीवर समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या
परळी (रिपोर्टर)- राज्याचे कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारात आज आत्ता, ताबडतोब प्रमाणे सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तात्काळ उत्तर शोधले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. परळी मतदारसंघासह अंबाजोगाई तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरीक या जनता दरबारात सहभागी झाले होते. या वेळी अनेक नागरीकांच्या समस्या ना. मुंडेंनी समजावून घेत संबंधित अधिकार्यांना त्या समस्यांचे निराकरण करण्याबाबतच्या तात्काळ सूचना दिल्या.
अंबाजोगाई येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये हा जनता दरबार भरवण्यात आला होता. मतदारसंघातील नागरीकांसह जिल्हाभरातील कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्याहेतू या सभागृहाचे आयोजन केले गेले. राज्याचे कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज दुपारी हा जनता दरबार सुरू झाला. जनता दरबारामध्ये उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने मतदारसंघासह जिल्हाभरातील नागरीक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली. या वेळी अनेकांच्या समस्या ना. मुंडेंनी ऐकून घेत त्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. ज्या नागरीकांचे प्रशासकीय कामे अडकून पडले आहेत, ते कामे तात्काळ करण्याबाबत प्रशासनातील उपस्थित अधिकार्यांना सूचना दिल्या. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ना. मुंडे परळीसह अंबाजोगाई तालुक्यावर तेवढेच प्रेम करत असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थित नागरीकांनी दिल्या. अंबाजोगाईच्या सर्वसामान्य नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवत आपआपले प्रश्न मुंडेंच्या दरबारामध्ये मांडले. मुंडेंनीही त्या प्रश्नांची तात्काळ उकल करत आज, आत्ता, ताबडतोडचे अनेक निर्णय घेतले. दुपारी दोन वाजेपर्यंत दरबार सुरुच होता.