रॅलीत हजारो समाज बांधवांचा सहभाग
बीड (रिपोर्टर)- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहेत. आज श्रीक्षेत्र रामगड या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये हजारो समाजबांधवांचा सहभाग होता. रॅलीमध्ये रामगड परिसरातील अनेक गावातील मराठा बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्यावे, आंतरवली सराटे येथील महिला भगिनींवर करण्यात आलेल्या लाठी हल्ल्यातील अधिकार्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे, आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाचा चाळीस दिवसाचा दिलेला शब्द पाळावा, या सह इतर मागण्यांसाठी आज श्रीक्षेत्र रामगड या ठिकाणावरून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सकाळी धडकली. या रॅलीमध्ये रामगड परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेला होता. या वेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले.