Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडपरळीधनंजय मुंडेंनी परळीत व्यापारी व व्यावसायिक बांधवांसोबत केले लक्ष्मीपूजन

धनंजय मुंडेंनी परळीत व्यापारी व व्यावसायिक बांधवांसोबत केले लक्ष्मीपूजन

परळी (रिपोर्टर)- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रति वर्षी प्रमाणे आपले लक्ष्मीपूजन परळी शहरातील व्यापारी व विविध व्यवसायिकांसमवेत साजरे केले. ना. मुंडे यांनी परळी शहरातील संपूर्ण बाजारपेठेत पायी फिरून प्रत्येक लहान-मोठ्या दुकानात जाऊन सर्व व्यावसायिक व व्यापारी बांधवांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्यासह जि. प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, बाजरी समितीचे सभापती ऍड. गोविंद फड, जि. प. सदस्य प्रा। मधुकरराव आघाव, पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, नगरसेवक दिपक देशमुख, शकील कुरेशी, जयप्रकाश लड्डा, संजय फड, जयपाल लाहोटी, सूर्यभाननाना मुंडे, शंकर कापसे, विजय भोयटे, सय्यद सिराज, बालाजी वाघ, प्रा. विनोद जगतकर, शंकर आडेपावर, दिलीप कराड, भावड्या कराड, सुरेश टाक, माऊली मुंडे, अतुल मुंडे,  वैजनाथ सोळंके, आयुब पठाण, गोपाळ आंधळे, चेतन सौन्दळे, सुरेश नानवटे, ज्ञानेश्‍वर होळंबे, यांसह विविध आघाडीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत भेटी गाठी व शुभेच्छांचे सत्र सुरूच होते!

Most Popular

error: Content is protected !!