पात्रुड ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले
राजकीय वातावरण तापले; गटातटाचे राजकारण सुरू
पात्रूड (रिपोर्टर)-माजलगाव तालुक्यातील स्थानिक पात्रुड ग्रामपंचायतची मुदत 2 मे 2023 मध्ये संपली असून या महिन्यात पात्रुड ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तथा अधिसूचना प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरी पक्षाचे पुढारी व कार्यकर्ते पुर्वी पासुनच निवडणूक कामाला लागल्याचे चित्र आहे. याही वेळेस सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार असून सर्व साधारण महीला प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव आहे. काही नागरिक सरपंच पदासाठी उत्सुक असून सर्व पक्षाचे पुढारी योग्य चेहर्याच्या शोधात आहेत सरपंच पदाचे रोस्टर निश्चित झाले. थेट सरपंचाची निवड जनतेतून होणार असल्याने ही ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच गाजणार आहे. तेव्हा गटातटाच्या राजकारणात सध्या चांगलीच रंगत भरण्यास सुरुवात झाली आहे. पात्रुड येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सहा प्रभागांमधून सरपंचासह 17 सदस्यासाठी निवडणूक होणार आहे.
सरपंच पदासाठी जनतेमधून निवडणूक प्राप्त झालेले विशेष अधिकार गावपातळीवर येणार्या विविध वित्त आयोगाच्या निधीमुळे गावातील काही राजकीय पुढार्यासह नागरिकांचे सरपंच पदाच्या निवडणुकीकडे डोळे लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सह एमआयएम ही निवडणूक रिंगणात असून सरपंच पदाचे रोस्टर जाहीर होताच राजकीय पुढार्यांनी देखील आपल्याच पक्षाचा सरपंच व ग्रामपंचायत असावी असा राष्ट्रवादी काँग्रेस व एम आय एम पक्षाने चंग बांधला असून त्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत एकूण सात प्रभाग आहे पुढारी व कार्यकर्ते प्रशासनाच्या निवडणूक अधिसूचनेची तर हौसे, गवसे, नवसे, मतदार ग्रामपंचायत निवडणुकीची चातकासारखी आतुरतेने वाट बघत होते.
सरपंच पदासाठी अनेक इच्छुक पुढे येऊ लागले असताना या पदासाठी आता युवकांनी राजकीय क्षेत्र म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली असल्याने होणारे सरपंच पदाची निवडणूक ही अतिशय चुरशीची वार्ता व अतितटीची होणार हे निश्चित झाले आहे नोह्मबर 2023 ला माजलगाव तालुक्यातील पात्रुड ग्रामपंचायत ची निवडणूक होणार आहे जनतेतून निवडल्या जाणार्या सरपंचाला मिळणारा मान सन्मान लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले असुन माजी सरपंच एकनाथ मस्के,नजीर कुरेशी, लतिफ मोमीन, यांचाही सरपंच पदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे पंचायत समिती चे माजी उपसभापती लतिफ मोमीन यांचं सौभाग्यवती सरपंच पदासाठी निवडणूक लढवणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान पंचायत समिती उपसभापती डॉ वसीम मनसबदार यांचे बंधू विधमान सरपंच अॅन्ड कजीम मनसबदार यांनी ही विकास कामांच्या जोरावर यांचे सौभाग्यवतीला निवडणुकीत उतरवणार आहे तसेच या पदासाठी एम आय एम चे जिल्हा उपाध्यक्ष शेख युसूफ यांच्या सौभाग्यवती विधमान उप सरपंच ही सरपंच पदासाठी निवडणूक लढवणार आहे पात्रुड सरपंच पदासाठी तिरंगी लढत होणार आहे .