नेकनूर (रिपोर्टर)- नेकनूर येथील बसस्थानकासमोर दोन ठिकाणी अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 19 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केली.
नेकनूर येथील बसस्थानकासमोरून एम.एच. 25 आर. 2823 या गाडीतून दारू जात असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी सदरील गाडीची झाडाझडती घेतली असता त्यात 13 हजार रुपयांची दारू आढळून आली. अन्य एका ठिकाणीही कारवाई करून तेथेही 5 हजाराची दारू जप्त केली. एकूण 19 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील गाडी ही ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी प्रकाश राऊत, परमेश्वर राजधाने या दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेप्रमुख विलास हजारे, नितीन गुट्टेवार, आप्पासाहेब रोकडे, बांगर, बलवंत यांनी केली. या प्रकरणाचा तपास सचीन वंजारे हे करत आहेत.