अग्रलेख-कुटे ग्रुप बीडची शान
होय त्याला आज
विश्वासाची गरज
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
होय त्याला उद्द्योग उभारायला पुणे मुंबई संभाजीनगर सारखे मोठमोठे शहर उपलब्ध होते. जिथं उद्योगांना अधिक चालना मिळण्यासाठी सर्व भौतिक साधन उपलब्ध असतात. तरी ही सुरेश कुटे या माणसाने दोन दशकभरा पूर्वी बीड सारख्या मागासलेल्या शहरात उद्योग उभे करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तो केवळ मातीशी इमान आहे म्हणूनच ! मातीतल्या माणसासाठी मातीतल्या माणसाचे इमान म्हणजेच रक्ताचे नाते असतें. तेच नाते कुटे यांनी बीड जिल्हाच्या माणसाशी कायम राहावे म्हणून तर कुटे ग्रुप चे रोपटे बीड मध्ये लावले. मेहनतीने त्याला इमानाचे आणी विश्वासाचे खतपाणी घालत ते मोठे केले याच कालावधीत ज्ञानराधा नावाची पतसंस्था उभारत खाजगी सावकारकीला चाप कसा बसेल अन सर्वसामान्य गरजवंतांना बँक इंटरेस्ट ने पैसे कसे उभा करता येतील याचे धोरण आखले. खरं तर कुटे यांनी दुष्काळी बीड जिल्हात नवउद्योग करू पाहणार्या तरुणांना आशेचा किरण दाखवला आणी जिल्हात नव्हे राज्यात नव्हे, तर देशात आणी विदेशात कुटे ग्रुप व तिरुमला चे नाव केले इथेच
पोट कुणाचे दुखले
माहिती नाही कुटेचे उद्योग साम्राज्य उभा राहत गेले त्या विस्तार ही होत आहे. मात्र काही जाळकांड्यानी (जळावू वृत्ती चे लोक ) कुटे यांच्या प्रगतीवर आक्षेप घेत याचा डोलारा एक ना एक दिवस कोसळणार असे भाकीत करू लागले हे भाकीत करणारे कोण? ते तेच ज्यांना साधं किराणा दुकान चालवता आलं नाही. कुटे नि कुठून आणलं, काय केल, येवढ मोठं कोण होत का, त्याचा थाट किती, कसा, गाड्यांचा ताफा जसा नीता आंबानी निघाल्यात अश्या एक ना अनेक निगेटिव्ह चर्चा केल्या तरी ही कर्तव्य हेच कर्म मनात सुरेश कुटे यांनी जगद्गुरू संत तुकोबांनी सांगितल्या प्रमाणे
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥
उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥
परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रीया सदा बहिणी माया ॥
भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥
शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचें ॥
तुका म्हणे हेंचि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥
म्हणून त्यांना यश येत गेलं तुकोबा म्हणता जो मनुष्य उत्तम उद्योग धंदा करून धन कमवितो आणि त्याचा विनियोग चांगला, उत्तम करतो त्याचं मनुष्याला उत्तम गती मिळेल .आणि तो उत्तम जन्माला येऊन पुन्हा सुख भोगेल. जो मनुष्य केव्हाही परनिंदा करत नाही आणि परस्त्री व परनारी यांना आई ,बहीण यांच्या समान मानतो व सर्वांवर परकर करतो ,तसेच जो सर्व प्राणिमात्रांना वर नेहमी दया करतो, गायी सारखेच इतर प्राण्यांचे पालन पोषण करतो आणि आडराणी तहानलेले जीवांना पाणी पाजतो ,जो शांत राहून कोणाचे मन दुखवत नाही कोणाशीही वाईट वागत नाही तो आपल्या वाडवडिलांचे महत्त्व वाढवितो .तुकाराम महाराज म्हणतात आदर्श युक्त गृहस्थाश्रमा साठी हेच फळ आहे आणि वैराग्याचे हेच परम बळ आहे.हे सर्व कुटे ग्रुप करत आला
येवढ सर्व करताना
कायद्याच्या राज्यात
जेव्हा उद्योग उभा केला जातो तेंव्हा त्या उद्योगातुन मिळणार्या नफ्याची कर भरणा करावी लागते. एवढे मोठे उद्योग उभे राहिले मग ते योग्य पद्दतीने चालु आहेत का शासनाचा कर भरला जातो का यासाठी आपल्या कडे आयकर विभाग, ईडी सह अन्य विभाग लक्ष ठेऊन असतात कालपरवा कुटे ग्रुपच्या देशातील सर्व कार्यालयावर आयकर विभागाचे छापे पडले. कागदपत्रे तपासणे सुरु झाले. मात्र इकडे काही नतद्रष्ट लोकांनी आपले आसुरी वासना शमवण्या हेतू कुटे यांची ज्ञानराधा बुडाली म्हणून अफ़वा सोडली अन ठेवीदारांनी लागलीच ज्ञानराधा च्या शाखा समोर पैसे काढण्यासाठी गर्दी करायला सुरवात केली. खरं तर आयकर विभागाचा छापा आणी ज्ञानराधा बँकेचा दूरदूरचा संबंध नाही. आणी ठेवीदारांची ही चूक नाही या आगोदर बीड जिल्हात अनेक बँका पतसंस्था लोकांना कोट्यवधी रुपयाला गंडा घालून पसर झाल्या आहेत. त्या मुळे सर्वसामान्य माणसांना आपल्याला कष्टाच्या पैश्यांची काळजी असणे साहजिकच परंतु जी संस्था विश्वासाच्या पाळामुळावर उभी आहे. ज्या संस्थेत विश्वासाचे बिजवरोपण झालेलं आहे त्या संस्थेवर अविश्वास दाखवणे गैरच. सुरेश कुटे यांची ज्ञानराधा ही विश्वासपात्रच !उलट आता अनेकांनी ठेवी काढल्याने ती काहीकाळ अडचणीत येईल म्हणजे वेवस्थापनाला त्रास होईल.एक तर इमानेइतबारे काम करून लोक अविश्वास दाखवतात याचे दुःख अन ठेवी वजा वाटप याची गोळाबेरीज त्यांना करावी लागेल जशी ज्ञानराधाला परेशानी झेलावी लागेल तसे ठेवीदारांना नुकसान सोसावे लागेल. मुदतपूर्व ठेवी काढणे म्हणजे ठेवीदारांचे नुकसानच ना पण अफवेला बळी पडणाराना कोण सांगणार परंतु आम्ही
छातीठोक पणे सांगू ज्ञानराधा
आणी कुटेग्रुप बीड जिल्ह्याची शान
आहे. बीड जिल्ह्याचा मान आहे. बेरोजगारांचा रोजगार आहे. चूल आणी मुलं इथपर्यंत मर्यादित असलेल्या महिलांचा आधार आहे. तरुण मुलामुलींची तिरुमला संधी आहे, तिरुमला आणी कुटे ग्रुप बीड जिल्हाचे जसे भविष्य आहे. तसें नवतरुणांना कुटग्रुप एक चेतना आहे. आज सुरेश कुटे व अर्चना कुटे या दांपत्यांनी बीड सह राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिले आहे त्यांच्या घरत चूल पेटवली आहे. महिला कर्मचार्यांसाठी कंपनीतील सुविधा महिलांचा आत्मविश्वास वाडवणार्या आहेत अश्या ग्रुपला बदनाम करण म्हणजे आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेणं होय. कुटे यांना हे उद्योग इतर शहरात ही उभा करता आले असतें एक व्यापारी म्हणून नफेखोरी करता आली असती परंतु केवळ माझ्या जिल्हात मोठमोठे उद्योगधंदे नाहीत, कोणी ते टाकण्यासाठी येत ही नाही. आपण इथेच उद्योग उभारावेत आणी जगाच्या पाठीवर बीडचे नाव घेऊन जावे हा शुद्द हेतू त्यांनी साध्यही केला. जगाच्या पाठीवर आपल्या बीड सह कुटे ग्रुपचे नाव नेले परंतु त्यांना आपण काय देतोय. अविश्वास अरेरे असे कमनशिबी होऊ नका. त्या माणसाला विश्वासाचे बळ द्या. संघर्ष करण्यासाठी धर्य द्या मग बघा हा माणूस जगाच्या कान्याकोपर्यात बीड चे नाव घेऊन जातो की नाही. अनेकांना प्रश्न पडला असेल एका उद्योगपती बाबत आम्ही का वकिली करतोय, पडलाय ना प्रश्न त्याच ही उत्तर देऊन टाकतो गेल्या 30 वर्षाच्या पत्रकारितेत रिपोर्टर ने सत्याची कास धरतं संघर्ष करणार्या प्रत्येक क्षेत्रातील माणसांना बळ देण्याचे काम केले आहे. आज कुटे ग्रुप आणी सुरेश कुटे यांच्या कर्तृत्व कर्माला सलाम करत त्यांच्या सोबत तुम्ही आम्ही विश्वासाने चालव यासाठी हा अट्टाहास आहे. कुटे ग्रुप कुठेही अडचणीत नाही किंवा ज्ञानराधा कुठे पळून जाणार नाही हा सुरेश कुटेंचा शब्द आहे. आमचा त्याच्यावर विश्वास आहे. तुमचाही असायला हवा. कुटे ग्रुप चा वटवृक्ष मोठा झालाय त्याच्या मुळांशी खोडसाळपणे घाव घालणार्या लोकांपासून सावध रहा, कुटे ग्रुप जिल्ह्याची शान आहे