सोन्याच्या दागिन्यासह नगदी रक्कम पळवली
बीड, (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यामध्ये दररोज कोठे ना कोठे चोरीच्या घटना घडत आहेत. अलिकडच्या कार्यकाळात जिल्ह्यात चोर्या वाढल्या. गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथे दिवसा ढवळ्या चोरी झाली. चोरट्याने सोन्या चांदीच्या दागिन्यासह नगदी रक्कम असा एकूण 1 लाख 4 हजार 400 रूपयांचा माल चोरून नेला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब अक्रुर राऊत यांच्या घरी दिवसा ढवळ्या चोरी झाली. चोरट्याने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत आतील सोन्याची चैन, बदाम, एक ग्राम सोन्याचे दोन नथ, कानातले एक जोड, नगदी 50 हजार रूपये असा एकूण 1 लाख 4 हजार 400 ऐवज चोरून नेला आहे. राऊत यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे निर्देशनास आल्यानंतर त्यांनी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
————
वाळूची चोरटी वाहतूक करणार्यावर कारवाई
ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त,राक्षसभुवन परिसरातील घटना
गेवराई, (रिपोर्टर)ः- बेकायदेशीरपणे वाळू घेवून जाणारा ट्रॅक्टर आणि एक ट्रॉली पोलिसांनी राक्षसभुवन शिवारामध्ये ताब्यात घेतली. यामध्ये एक ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी ट्रॅक्टर वाळूसह असा एकूण 5 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोदावरी नदी पात्रातून अवैध रित्या चोरटी वाळू वाहतूक केली जात आहे. राक्षसभुवन परिसरातून ट्रॅक्टरद्वारे वाळू घेवून जात असतांना पोलिसांनी ट्रॅक्टरसह ट्रॉली ताब्यात घेतली आहे. या ट्रॉलीमध्ये 1 ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी एकूण मुद्देमाल जप्त करत संबंधिताविरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणी विनोद सुरवसे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेश बंडू नाटकर याच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
—–
जुन्या भांडणाच्या कारणावरून वृध्द महिलेस कुर्हाडीने मारहाण
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
पाटोदा तालुक्यातील घटना
बीड, (रिपोर्टर)ः- जुन्या भांडणाची कुरापत काढून एका 80 वर्षीय महिलेसह अन्य एकास मारहाण करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना पाटोदा तालुक्यातील मिसाळवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पाच आरोपी विरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या भांडणाची कुरापत काढत लोचनबाई रावसाहेब मिसाळ (वय 80) व शिवनाथ रावसाहेब मिसाळ (वय 36 रा.मिसाळवाडी ता.पाटोदा) यांना नितीन बाजीराव सानप व इतरांनी कुर्हाडीने मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी आरोपी नितीन बाजीराव सानप (रा.सौताडा ता.पाटोदा), कृष्णा आजिनाथ मिसाळ, आजिनाथ बाबासाहेब मिसाळ, अप्पासाहेब आजिनाथ मिसाळ, अलका आजिनाथ मिसाळ यांच्या विरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








