महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त धनंजय मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा
परळी (रिपोर्टर): परळी स्थित प्रभु वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असून, शिवपुराणात वैद्य नाथ या अर्थाने या पाचव्या ज्योतिर्लिंगास अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाशिवरात्रीचे पवित्र पर्व हे सर्व शिवभक्तांच्या आयुष्यामध्ये उत्तम आयुरारोग्य व समृद्धी घेऊन येवो, प्रभू वैद्यनाथ सर्वांचं भलं करो, अशी प्रार्थना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक देशभरातून परळी नगरीत दाखल होऊन दर्शन घेत असतात. याही वर्षी लाखो भाविक परळी नगरीत दाखल होताना दिसत असून धनंजय मुंडे यांनी सर्व शिवभक्तांचे प्रभुवैद्यनाथांच्या परळी नगरीत स्वागत करत असल्याचे म्हटले आहे.
महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने फराळ व फळे वाटपासह यात्रा महोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी नात प्रतिष्ठानच्यावतीने यात्रा महोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचाही लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विविध सुविधा, पार्किंग, वाहतूक, स्वच्छ पिण्याचे पाणी यांसह विविध सुविधांच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी नगर परिषद, तहसील व पोलीस प्रशासनास योग्य सूचना देखील केल्या आहेत.