
बीड, (रिपोर्टर)ः-प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गरजू नागरीकांसाठी घरकुल दिले जाते. दरवर्षी देशात हजारो घरकुल बांधले जात आहेत. घरकुलासाठी सेल्फ सर्व्हे केला जात आहे. याची शेवटची तारीख आजची आहे. आतपर्यंत जिल्ह्यात 84 हजार 485 जणांनी घरकुलासाठी नोंदणी केली. आज शेकडो नागरीक नोदणी करू शकतात. नोंदणी झाल्यानंतर ग्रामीण विकास विभागाकडून त्याची छाननी होईल व त्यानंतर संबंधितांना घरकुल मंजूर केले जाणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात हजारो घरकुल मंजूर करण्यात आले त्यातच देशभरात लाखो घरकुलांना मंंजूरी मिळालेली आहे. घरकुलापासून जे नागरीक वंचित राहिलेले आहेत. त्यांना घरकुल देण्यात येणार आहे. त्यासाठी सेल्फ सर्व्हे करण्याचे निर्देश देशाच्या ग्रामीण विकास विभागाकडून प्रत्येक जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. गावपातळीवर सेल्फ सर्व्हे करण्यात येत आहे. त्याची शेवटची तारीख आजची आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 74 हजार 485 नागरीकांनी घरकुलासाठी नोंदणी केलेली आहे. आज आणखी त्यात भर पडणार आहे.





