आष्टी (रिपोर्टर):-
तालुक्याची कामधेनू आता दूध देण्यास सुरुवात झाली आहे.मागिल १९ वर्षांपासून बंद असलेला कडा सहकारी साखर कारखाना बॅकेने कर्ज असल्यामुळे जप्त केला होता.परंतु मा.आ.भिमराव धोंडे यांच्या विशेष प्रयत्नाने बॅकेचे कारखान्यावरील थकीत कर्ज कायदेशीर प्रक्रियाने भरुन महाराष्ट्र सहकारी बँकने संचालक मंडळाकडे कारखान्याचा ताबा दिला आहे.आज दि.२८ रोजी मा.आ.भिमराव धोंडे यांच्या हस्ते प्रत्यक्ष कारखाना सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू केले आहे.माझा जन्मच पाचाटात झाला आहे.मी लहान असताना २५ एकर ऊस होता.तेव्हापासून ऊसाची आवड आहे.मी वयक्तिक कारखाना घेऊ शकलो असतो परंतु सहकारी कारखाना ताब्यात घेऊन जनतेचा विश्वास घात करायचा नव्हता बंद पडलेली काम धेनू आता सुरू होणार असून ३० टक्के महिलांना कारखान्यात काम देणार आहोत.समुहाला बरोबर घेऊन जाण्याची सवय लहानपणापासून च आहे.मी आंदोलनात जेल भोगले आहे . कारखाना प्रामाणिकपणे चालावायचा आहे .आष्टी भुकाड एरिया म्हणायचे आता गेलेले वैभव पुन्हा निर्माण करायचे आहे.चांगली भावना ठेवून कारखान्याला सहकार्य करा असे आवाहन मा.आ.भिमराव धोंडे यांनी केले.
आष्टी तालुक्याची कामधेनू कडा सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र सहकारी बँक १/८/२००७ रोजी जप्त केला होता.कर्ज ३५ कोटी होते.ओटीएस मध्ये कायदेशीर प्रक्रियाने कर्ज चंलाकड मंडळाने भरणा केला असून संचालक मंडळाच्या ताब्यात कारखाना देत असल्याचे बॅकेच्या अधिका-यांनी सांगितले
चेअरमन चंलाक मंडळाच्या ताब्यात सहकाराचे पुनरा जिवन थकीत वसुली झाली यावेळी मा.आ.धोंडे पुढे बोलताना म्हणाले की माझे अजय अभय आध्यदैवत महेश असल्याने महेश सहकारी साखर कारखाना नाव नव्याने देणार असल्याचे जाहीर केले.महादेव मंदिर येथे करणार आहोत.भर्ती पॅटर्न चेंज करणार आहोत भरती ३० टक्के महिला काॅम्पुटर महिला चालवणार आपल्या परीसरातील एम एससी अॅग्री झालेल्या मुलींना नौकरीची संधी देणार आहोत. उद्या जाहिरात प्रसिद्ध करणार आहोत.कारखाना सुरू होण्यात मुख्यमंत्री यांचा मोठा रोल एक रकमी रक्कम कमी केली सहकार मंत्री पाटील यांनी सहकार्य केले ओटीएस मध्ये एकमेव कारखाना २० कोटी भरल्याने आपल्या ताब्यात आला आहे.समुहाला बरोबर घेऊन जाण्याची सवय काॅलेज जिवनापासूनच आहे.गेलेले वैभव निर्माण करायच आहे.चांगली भावना ठेवून कारखान्याला सहकार्य करा शेतात ऊस लावा असे आवाहन केले यावेळीयुवा नेते अजयदादा धोंडे, राजेश धोंडे, विठ्ठल लांडगे,बजरंग कर्डीले , अशोक साळवे, आण्णासाहेब लांबडे , सरपंच दादासाहेब जगताप, सरपंच सावता ससाणे,शिवाजी थोरवे, सोनाजी गांजुरे, भाऊ घुले, सदाशिव दिंडे, माजी शिक्षण सभापती नियामत बेग, पांडुरंग गावडे, कचरु भुकन, कुंडलिक आस्वर, अंकुश मुंढे, उपसभापती पांडुरंग नागरगोजे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.