अंबाजोगाई शहरातील घटना, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर) ः प्रेमप्रकरणाच्या कारणावरुन एका तरुणास मुलीच्या भावासह इतरांनी कोयत्याने मारहाण केल्याची घटना अंबाजोगाई शहरामध्ये घडली आहे. त्यात तरूण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकुमार करडे याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोघांची जात वेगवेगळी असल्याने या लग्नाला विरोध होत होता. या प्रेमप्रकरणावरून राजकुमार करडे यास उखरी रोडवरील हॉटेल वृंदावन येथे मारहाण करण्यात आली. सदरील ही मारहाण मुलीच्या भावासह इतर तरुणांनी केली. यात करडे हा गंभीररित्या जखमी झाला. याप्रकरणी केसरबाई करडे यांच्या फिर्यादीवरून वैद्यनाथ शिंदे, वेदांत शिंदे, आदिनाथ भांडे सर्व रा. सारडा नगरी, अंबाजोगाई व अन्य एक अशा सर्व जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.