बीड जिल्ह्यातील
16 केंद्रांवर 6146 विद्यार्थी परीक्षा देणार
बीड (रिपोर्टर): बारावीनंतर वैद्यकीय शाखेतील प्रवेशासाठी देशपातळीवर नॅशनल टेस्टींग एजन्सी मार्फत घेण्यात येणारी नीट ही पुर्व परीक्षा आज दि.4 रविवार रोजी सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यात 16 केंद्रावरून 6,146 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बारावीनंतर वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हि प्रवेश पुर्व परीक्षा देत असतात. देशस्तरावर एकाचवेळी एकच प्रश्न पत्रिकेच्या आधारे ही परीक्षा होत असल्याने प्रश्नांची कठीणता पातळी आधिक असते.परीक्षेचे नियमही अधिक कडक असतात. नीटचा पेपर दुपारी 2 ते 5 असा 3 तासांचा आहे.
परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत प्रवेश दिला जाणार आहे.दीड वाजल्यानंतर कोणत्याही कारणाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात दिला जाणार नाही.त्यामुळे वेळेचे नियोजन व दुपारचे ऊन्ह टाळुन परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी पालक आणि विद्यार्थी यांची धावपळ सुरू आहे.परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र तसेच आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक फोटो ओळखपत्र सोबत असणे आवश्यक असुन वरील कागदपत्रांच्या मुळ प्रति आवश्यक असुन छायाप्रती किंवा डिजिटल प्रति वैध राहणार नाहीत.
याबरोबरच विद्यार्थ्यांना नोट्स, कागदपत्रांचे तुकडे,जिओमेट्री बॉक्स, प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, पेनड्राईव सारखे कोणतेही अभ्यास साहित्य , मोबाईल फोन, पेजर, स्मार्ट वॉच, हेल्थ बाण्ड, ईअरफोन ,ब्लुटुथ डिव्हाईस,,मायक्रोफोन,पाकेट, सनग्लासेस,बेल्ट, कँप, कॅमेरा, दागिने किंवा कोणत्याही धातुच्या वस्तू बाळगण्यास परवानगी नाही. विद्यार्थ्यांसोबत पालकांची परीक्षा असुन उन्हातान्हात झाडाच्या सावलीचा आधार घेऊन पालक परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत बसल्याचे चित्र दिसून येते. परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आहे.