चार जणांवर गुन्हे दाखल

गेवराई (रिपोर्टर): गेवराई पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरुद्ध प्रभावी कारवाई करत चार जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करुन या कारवाईत एकूण 10,930 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गेवराई पोलिसांनी अवैध धंद्यांना चाप लावला आहेत. ही कारवाई 2 मे रोजी पाचेगाव, राजपिंपपरी आणि उमापुर -शेवगाव रोड परिसरात गोपनीय माहितीच्या आधारावर करण्यात आली. पोलिस अधीक्षक नवनीत कंवत, अपर पोलिस अधीक्षक पांडकर आणि पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की 2 मे रोजी सायंकाळी 18.40 वाजता आहेर वाहेगाव शिवारातील हॉटेल शिवनेरी येथे पांडुरंग पंडित पुरी याच्याकडून 16 बॉबी संत्रा (1120 रुपये) आणि 8 रॉयल स्टॅग (1520 रुपये) अशा 2640 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. दुसर्या घटनेत, 18.15 वाजता वाघदरा फाट्यावरील हॉटेल सासुरवाडी समोर अनिल भाऊसाहेब राठोड याच्याकडून 20 संत्रा (1400 रुपये), 10 ब्लॅक डिलक्स (1400 रुपये) आणि 8 रॉयल स्टॅग (1520 रुपये) असा 4320 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तिसर्या घटनेत, 18.30 वाजता हॉटेल तात्याचा धाबा समोर सखाराम रामराव माने याच्याकडून 10 टुबर्ग (1950 रुपये) आणि 4 मॅक्डॉल (640 रुपये) असा 2590 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चौथ्या घटनेत, 19.45 वाजता उमापुर शेवगाव रोडवरील हॉटेल निवांत धाबा समोर वाल्मीक अरुण घाडगे याच्याकडून 10 संत्रा (700 रुपये), 8 भिंगरी संत्रा (280 रुपये) आणि 4 मॅजिक मोमेंट (400 रुपये) असा 1380 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई सपो.नि. संतोष जंजाळ, पो.उप.नि. भुतेकर, पो.उप.नि. रामदास खोत, पो.उप.नि. निशीगंधा खुळे, पो.शि. डोके, पो.शि. रुषीकेश पोटे, पो.शि. रामेश्वर काकडे यांनी यशस्वीपणे पार पाडली. एकूण 10,930 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गेवराई पोलिसांनी अवैध धंद्यांना चाप लावला. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.






