
60 ते 70 हजार रोकड व जिवनावश्यक वस्तू जळून खाक
आष्टी ( रिपोर्टर):-तालुक्यातील क-हेवडगांव येथील श्रीधर खांडवे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून गृहपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दि. 13 मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आगीचा भडका उडाल्याने घरातील असलेल्या फ्रीज व इलेक्ट्रॉनिक वस्तू चा स्फोट झाला दरम्यान घरात कोणाही उपास्थित नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या घटनेत घरातील सर्व संसारउपयोगी वस्तू जळून नष्ट झाल्या आहेत.आगीच्या घटनेमुळे मजूरी करुन आपले जीवन जगणार्या खांडवे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबाचे घर पुन्हा उभे करण्याचे मोठे प्रश्न उपस्थित झाले आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून तातडीने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
तालुक्यातील क-हेवडगांव येथील मोलमजुरी करून उपजीविका भागवणारे श्रीधर खांडवे यांचे कुटुंब असून काल दि.13 मे रोजी सायंकाळी अचानक विजेच्या शॉटसर्किटमुळे आगीचा भडका होऊन मोठा स्फोट झाला यामध्ये स्फोट ऐवढा मोठा होता की आगीचे लोळ ची लोळ बाहेर पडत होते.यावेळी त्यांच्या घरात कोणीच नव्हते. म्हणून सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत घरातील फ्रिज, अन्नधान्य व जीवन उपयोगी वस्तू, कागदपत्रे जळून खाक झाल्या.रोकड ही 60 ते 70 हजार जळून खाक झाली व 2 लाखापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पिडीत खांडवे कुटुंबीयांनी सांगितले पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मा.सरपंच जालिंदर नेते गायकवाड यांनी केली आहे.