• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home थेट सवाल

भाषेवर भांडताय, आधी सांगा या पापाचे बाप कोण?

by गणेश सावंत
June 25, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


शेख मजीद

जिल्ह्यात चार वर्षात 37 हजार विद्यार्थ्यांनी जि.प.ची शाळा सोडली
पंधरा शाळा बंद, पाचशेपेक्षा अधिक वर्गखोल्या नादुरुस्त, अनेक शाळात वीज नाही
दळभद्री कोण? शासन, प्रशासन, शिक्षण विभाग, शिक्षक, लोकप्रतिनिधी की पालक ?



शाळांमधील विद्यार्थ्यांना कुठली भाषा शिकवायची? यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरे सुरू असताना प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था काय हे सत्ताधारी आमदारांना सोडा विरोधी लोकप्रतिनिधींनाही माहित नाही. केवळ राजकारण म्हणून कुठल्याही गोष्टीचा चोथा चघळायचा आणि वस्तूस्थितीपासून सर्वसामान्यांना दूर ठेवायचे. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधली धक्कादायक माहिती समोर येतेय. गेल्या चार वर्षांच्या कालखंडात बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून एक-दोन नव्हे, पाच-पन्नास नव्हे, हजार-पाचशे नव्हे तर तब्बल 37 हजार विद्यार्थी बाहेर पडले आहेत. परिणामी जिल्हा परिषदेच्या पंधरा शाळा बंद कराव्या लागल्या. केवळ जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना ज्ञानर्जन केले जात नाही यामुळे हा पालकांनी निर्णय घेतला असावा. मात्र हा बीड जिल्हा कष्टकरी, कामगारांचा जिल्हा असल्यामुळे सर्वसामान्यांना खासगी शिक्षण परवडत नाही, याची माहिती असतानाही बीड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सावळागोंधळ सुरू आहे. म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थी परागंदा झाले, ही बाब चिंताजनक आणि बीडच्या शिक्षण विभागाला अतंर्मुख करायला लावणारी.

शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यापासून जि.प. शाळांना घरघर लागू लागली. एकीकाळी जि.प. शाळांचा दरारा होता. आज जि.प. शाळांवर वाईट वेळ आली. जि.प. शाळेत शिक्षण घेणार्‍यांची संख्या दहा ते पंधरा वर्षापुर्वी मोठ्या प्रमाणात होती, आज प्रत्येक वर्गात मुलं बोटावर मोजण्या इतकेच दिसून येतात. मुला अभावी काही वर्ग दरवर्षी बंद करण्याची वेळ येवू लागली. शाळांना घरघर लागण्याची अनेक कारणे आहेत. शासन जि.प. शाळाकडे दुर्लक्ष करत असून जिथं, तिथं खाजगी शाळांना परवानगी दिली जात आहे. त्यातच जि.प.तील शिक्षकांवर अधिकार्‍यांचा वचक राहिला नाही. शिक्षक कधी, येतात, आणि कधी जातात, याची विचारणाच होत नाही. काही बोटावर मोजण्या इतकेच जि.प.तील शिक्षक चांगले आहेत. शाळा सुरु झाल्या की, शिक्षकांना मुलं शोधण्याची वेळ येते. मुलं कमी झाले की, शिक्षकाचं पद उडतं. आपलं पद उडू नये म्हणुन शिक्षकांची प्रचंड धडपड असते, पण मुलचं नसल्यामुळे शिक्षकांचा नाविलाज असतो.

अनेक गावात खाजगी शाळांच्या गाड्या घरपोहच जातात. खाजगी शाळातील शिक्षण आणि जि.प.तील शिक्षण यात फरक जाणवू लागल्याने पालक खाजगी शाळाकडे वळू लागले. काही गावातील राजकीय कुरघोड्यामुळे देखील जि.प. शाळांना फटका बसत आहे. जि.प. शाळात सुविधाही नसतात. त्यामुळे पालकांचा या शाळाकडे कानाडोळा होत आहे. बहुतांश अशा शाळा आहेत, त्यांना व्यवस्थीत छत नाहीत. शिक्षण विभाग नवीन इमारतीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देत नाही. प्रत्येक पालकांना वाटत असतं. आपलं मुल चांगल्या शाळेत शिकलं पाहिजे. शाळांच्या वाईट अवस्थामुळे जि.प.शाळातील मुलांची संख्या दिवसे,दिवस कमी होवू लागली. गेल्या चार वर्षात बीड जिल्हयात 37 हजार मुलांची संख्या कमी झाली. मुलांची संख्या अशीच कमी झाली तर येत्या दहा वर्षात जि.प.च्या शाळा राहतात की, नाही असाच प्रश्‍न पडू लागला आहे.

पंधरा शाळा बंद झाल्या
जिल्हा परिषद शाळेतील मुलांची संख्या कमी होत असल्याने त्याचा परिणाम शिक्षक आणि शाळावर होवू लागला. मुलं कमी झाले की, वर्ग उडतात. गेल्या चार वर्षात जिल्हयातील 15 शाळा कमी झाल्या आहेत.


बीड शहरात 35 शाळात 2 हजार विद्यार्थी
ग्रामीण भागात ज्या प्रमाणे जि.प. शाळांची अवस्था आहेत. त्या पेक्षा शहरी भागात वाईट अवस्था दिसून येवू लागली. शहरामध्ये 35 शाळा आहेत. त्या शाळेत फक्त 2228 विद्यार्थी आहे. एकीकाळी शहरात नामंकीत जि.प. शाळा होत्या. त्या शाळांत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा पुरत नसायची इतकी विद्यार्थी संख्या होती. आज फक्त बोटावर मोजण्या इतकी विद्यार्थी संख्या राहिली आहे.

शिक्षण विभागाच्या पगारावर कोट्यवधी रुपयांचा खर्च
बीड जिल्ह्यात शिक्षणाधिकार्‍यांपासून ते जिल्हा परिषद शाळेच्या शिपायापर्यंत किमान 10 ते 15 हजार कर्मचारी-शिक्षक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिकवण्यासाठी असतील यासाठी शासन करोडो रुपयांचा पगार या सर्वांना देत आहे. अशा स्थितीत ऊसतोड कामगार आणि कष्टकर्‍यांच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे हाल आणि त्यातून शाळेमधून 38 हजार विद्यार्थ्यांचा परागंदपणा हा शिक्षण विभागाचा नाकर्तेपणा समोर मांडणारा आहे.

पाचशेपेक्षा अधिक खोल्या नादुरुस्त
बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील अवस्था ही खुराड्यासारखी झाली आहे. पाचशेपेक्षा अधिक खोल्या नादुरुस्त आहेत. सर्वसामान्यांना आपले विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायचे असते परंतु सरकार शिक्षणावर खर्च करत असताना बीड जिल्ह्यात मात्र शिक्षण विभागाने शिक्षणाचा बोजवारा उडवून दिल्याचे या सर्व घटनाक्रमावरून दिसून येते.

Previous Post

शक्तिपीठ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी,

Next Post

मोटर सायकल आडवी लाऊन पोलिसांची यशस्वी कामगिरी

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post

मोटर सायकल आडवी लाऊन पोलिसांची यशस्वी कामगिरी

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?