दोन जुगार अड्डयावर धाडी; अवैध दारू विक्रेत्यासह, 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सिरसाळा (रिपोर्टर) येथील पोलिस स्टेशन हद्दिमधील धारूर तालुक्यांतील सिंगणवाडी, मोहखेड गावात अवैधरित्या जुगार, खेळत, दारू विक्री केली जात असल्याची माहिती सिरसाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांना मिळाली असता त्यांनी त्यांची टीम सोबत आज दिनांक 6 रोजी मोहखेड सिंगणवाडी गाव गाठून एकाचं दिवशी तीन ठिकाणीं धाडी टाकून एकुण नऊ हजार साठ रूपयाचा मुद्देमाल जप्त करून 11 जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की पोलिस स्टेशन हद्दिमधिल मौजे धारूर तालुक्यांतील सिंगणवाडी येथे पिंपळाच्या झाडा शेजारी बेकायदेशीररित्या देशी दारू सखू संत्रा कंपनीच्या 24 बॉटल जवळ बाळगून चोरटी विक्री करणार्या आरोपी अशोक अंगद भोसले यांच्यावर फिर्यादी अक्षय देशमुख यांच्या फिर्यादीवरून कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरी कार्यवाही मोहखेड गावात मारोती मंदिराच्या उजव्या बाजूस मोकळ्या जागेत विना परवाना बेकायदेशीर रित्या स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी गोलाकार बसून पत्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवत असताना जागीच नगदी माल 3460 रू मिळवून आले म्हणून आरोपी व्यंकटेश माधवे , अशोक जाधव, जयराम भोसले, रतन भोसले सर्व रा शिंगणवाडी ता धारूर यांच्यावर कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे फिर्यादी वैभव राउत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तिसरी कार्यवाही देखील ह्याच ठिकाणी रात्री सव्वा सात वाजता करण्यात आली असून यातील आरोपी रमेश उजगरे, पांडुरंग उजगरे, दत्ता उजगरे, प्रदीप उजगरे, हनुमंत गवळी, सर्व रा मोहखेड व अन्वर शेख सिरसाळा यांच्याजवळ नगदी मुद्देमाल 3200 रुपये मिळवुन आला म्हणून कलम 12 अ प्रमाणे विश्वजीत देवकते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला अश्या एका दिवसात तीन कार्यवाही सिरसाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या उपस्थितीत त्यांच्या टीमने केली असून एकुण आकरा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून नऊ हजार साठ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे गेल्या आठ दिवसांत कार्यवाहीचा धडाका चालूच असल्याने अवैध धंदे करणार्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवुन धाबे दणाणले आहे तर नागरिकांमध्ये पोलीसांच्या कामगिरी बद्दल स्तुती केली जात आहे.