मुंबई (रिपोर्टर)- शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
वेळ वाढवून मागितली आहे का? असं विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, हो मागितली आहे. इतकं मोठं प्रकरण आहे. संपूर्ण देश हादरला आहे. आपल्या देशात सध्या काहीच सुरु नाही. सध्या ही ५० लाखांची एकच केस त्यांच्याकडे आहे. मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल.