शेतकर्यासाठी दिलासा
हमीभावापेक्षा जास्त कापसाला भाव मिळू लागला
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये दरवर्षी कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघते. मात्र गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे बरेच नुकसान झाले. असं असतांनाही केंद्र सरकारने कापसाला योग्य हमी भाव दिला नाही. 8हजारांच्या दरम्यानच हमी भाव जाहिर केला. बहुतांश शेतकर्यांनी खाजगी व्यापार्यांना कापूस विकला तर काहींनी हमीभावावर कापसाची विक्री केलेली आहे. मात्र 1 जानेवारीपासून कापसाच्या दरात सुधारणा हेात आली. हमीभावापेक्षा जास्त दराने खाजगी व्यापारी कापूस खरेदी करूलागल्याने शेतकर्यांना दिलासा मिळू लागला. सध्या बाराज 8 हजार ते 8300-8400 रूपये या प्रमाणे कापसाची खरेदी होवू लागली आहे. आणखी काही दिवसात कापसाचे भाव वाढतात का या कडे देखिल कापूस उत्पादन शेतकर्याचे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचे सार्वधिक उत्पादन घेतले जाते. त्यातच देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, कनार्टक, गुजरात या राज्यातही कापसाचे उत्पादन निघत आहे. कापसाचे भाव हे आंतरराष्ट्रीय उत्पादनावरून ठरत असते. केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत कापसाच्या आयातीवर शुल्क लावलेला नव्हता. त्यामुळे ाहेरचा कापूस आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आल्याने इथल्या कापसाचे भाव पडले. 1 जानेवारीपासून मात्र बाहेरच्या कापसावर 11 टक्के टॅक्स लावण्यात आल्याने इथल्या कापसाच्या भावात सुधारणा होवू लागली. केंद्र सरकारने लां धाग्याच्या कापसाला 8110 तर मध्यम धाग्याच्या कापसाला 7710 रूपये हमीभाव जाहिर केला. हमीभावानुसार कापूस विकण्यासाठी शेतकर्यांना अनेक अडचणीत जावे लागत असल्याने काही तुरळक शेतकर्यांनी हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी नोंदणी केलेली आहे. अनेक शेतकर्यांनी तर खाजगी व्यापार्यांना 7 हजार 7500 या प्रमाणे कापूस विकला. जवळपास 40 ते 45 टक्के शेतकर्यांनी कापूसविकलेला आहे. मात्र मागील तीन दिवसापासून खाजगी व्यापारी 8 हजार, 8300-8400 या दरम्यान कापसाची खरेदी करत असल्याने शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू लागला. ज्या शेतकर्यांनी कापूस अजुन विकलेला नाही त्यांचा वाढत्या भावामुळे फायदा होवू शकतो आणखी कापसाचे भाव वाढतात का याची वाटही कापूस उत्पादक शेतकरी पाहत आहेत. कापसाचे वाढत असलेले भाव हे कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी दिलासा देणारी ा आहे.









