बीड (रिपोर्टर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांसाठी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकर्यांना 4 महिन्याला दोन हजार रुपये मिळतात. ज्या शेतकर्यांची केवायसी नसेल त्या शेतकर्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही. केवायसी करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर करण्यात आली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांसाठी सन्मान योजना सुरू केली. बीड जिल्ह्यात जवळपास चार लाखापेक्षा जास्त शेतकरी आहेत. या शेतकर्यांना आतापर्यंत सन्मान योजनेचा लाभ मिळालेला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. अनेक शेतकर्यांनी आपली केवायसी करून घेतली तर काही शेतकरी अजूनही यापासून अलिप्त आहेत. केवायसी करण्याची तारीख शासनाने वाढवली असून 7 सप्टेंबरपर्यंत केवायसी करता येणार आहे. यानंतर केवायसी न करणार्या शेतकर्यांना सन्मान योजनेचा लाभ दिला जाणार नाही.