• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

अंगभर कपड्यात पोटसुळ्या दिवट्यांना  दिसली अश्‍लीलता, वा रे इलेक्ट्रॉनिक मिडिया गरिबाची ती नाची, बिकिनीतली ती हिरोईन

by गणेश सावंत
September 2, 2022
Reading Time: 1 min read
0
अंगभर कपड्यात पोटसुळ्या दिवट्यांना  दिसली अश्‍लीलता, वा रे इलेक्ट्रॉनिक मिडिया गरिबाची ती नाची, बिकिनीतली ती हिरोईन
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

धनंजय मुंडेंचा गणेशोत्सव संस्कार आणि संस्कृतीचा परवणी देणाराच
बीड । रिपोर्टर
महाराष्ट्राच्या संस्कार, संस्कृती आणि लोककलेला अखंड हिंदुस्तानात अनन्यसाधारण महत्व आहे. महाराष्ट्राची लोककला आणि संस्कृती ही प्रेरणादायक, लढवई आणि वैचारिक पेरणी करणारी, म्हणूनच पारतंत्र्याच्या काळात अखंड महाराष्ट्राच्या लोककलेतील लोकनाट्य, नाटक, तमाशा, वग, लावणी, भजन, कीर्तन, पोवाडा, कव्वाली, अभंग, दोहे, यातून समाजाचे प्रबोधन करण्यात आले. निपचीत पडलेल्या स्वाभिमानाला जागृत करण्यात आले. तेच लोककलेचे कार्यक्रम गणेश उत्सवाच्या कालखंडात लोकमान्य टिळकांपासून आजपावेत सातत्याने होत असताना आता मात्र पितपत्रकारितलेले तथाकथीत इलेक्ट्रॉनिक मिडियाचे दिवटे  पत्रकार अशा कार्यक्रमांना सुपारीबाज होत  गालबोट लावून महाराष्ट्राच्या संस्कृतीला वेशीवर टांगू पहात आहेत. परळीत नाथ प्रतिष्ठाणच्या वतीने गणेशोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. काल धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाणने आयोजीत केलेल्या लावणीच्या कार्यक्रमाला काही मराठी वृत्तवाहिन्यांनी अश्‍लील नाच म्हणून संबोधलं. काही दिवट्यांनी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अंगभर कपडे असलेल्या कलावंतांमध्ये अश्‍लीलतेचा शोध घेतला. जिथं बिकनीवर सचित्र पहात लाळ गाळणारे हेच महाराष्ट्राच्या लोककलेला आणि तमाशी कलावंतांना अश्‍लील म्हणून संबोधतात तेव्हा संताप आल्याशिवाय राहत नाही. धनंजय मुंडेंच्या गणेशोत्सवामध्ये सर्वधर्मिय लोक एकत्रीत येत आहेत त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांची परवणी ठेवण्यात आली आहे आणि इथेच पाकिटाची आशा ठेवलेल्या काही तथाकथीत दिवट्यांना आपला अश्‍लीलतेचा चष्मा डोळ्यांवर लावून चांगल्या कार्यक्रमाला नाव ठेवत बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा हेतू जनतेसमोर आणला, तो निषेधार्हच.
आम्ही सातत्याने म्हणतो, अरे आमची गोरगरिबाची पोरगी अंगभर कपड्यामध्ये जेव्हा व्यासपीठावर आपली कला दाखवते तेव्हा हे भ्रमिष्ठ वैचारिक दळभद्री तिला नाची म्हणून हिणवतात. शेम शेमऽऽ तमाशा कलावंत जेव्हा लावणी सादर करते तेव्हा तिचा साज-श्रृंगार डोळ्यात समावणारा नसतो. काय असतो तिचा साजश्रृंगार, डोक्याला अंबाडा असतो, त्याला मोगर्‍याच्या गजर्‍याच्या माळेची गुंफण असते. कपाळावर कुंकू असतं, दोन्ही भांगाच्या मधून एक सुंदर बिंदिया असते. कानात डुले  असते. गळ्यात वेगवेगळ्या माळा असतात. अंगात चोळी असते. तिच्या बाह्या कोपरापर्यंत असतात. हातात मेहंदी असते, कमरेला कंबरपट्टा असतो, नववारी शालू नेसलेली आमची ही कलावंत घोट्यापर्यंत साडीत लिपटलेली असते. पायाच्या पंज्यांनाही मेहंदी असते. नखशिखांत साजश्रृंगारलेली, नटलेली कलावंत जेव्हा महाराष्ट्राची ओळख असलेली लावणी सादर करते तेव्हा अनेकांचे हृदय हलावून जाते. त्याच लावणीला नाच म्हणून संबोधणारे, त्याच लावणीकडे अश्‍लील म्हणून पाहणारे काही महाभाग काल आणि आज आम्हाला पहायला मिळाले. परळीमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठाणकडून गेल्या सतरा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सातत्याने सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. यावर्षीही संगीत, नाटक, कव्वाली, भीमगीतांचा कार्यक्रम, अजय-अतुल यांचे संगीतमय कार्यक्रम, महाराष्ट्राची हास्य जत्रा, चला हवा येऊ द्या यासारखे लोकप्रिय कार्यक्रम, ह.भ.प. इंदूरीकर महाराज यांचे समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम होत असताना काही पाकिटबाज इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या दिवट्यांनी यामध्ये नाच आणि अश्‍लीलता शोधली. तमाशात आणि अंगभर कपड्यात असलेल्या तमाशा कलावंतातील अश्‍लीलता शोधणार्‍या या तथाकथीत पत्रकारांना बिकनीतले कलावंतात मात्र बहुदा मातृत्व शोधत असावेत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही सांस्कृतिक कार्यक्रमातून तळागाळातील लोकांचे संघटन करून लोकांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी केली. आज राष्ट्रभक्ती ओतपोत होत असताना आता समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सांस्कृतीक, संस्कार, कला, संगीत, नाट्य हे जोपासण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी जेवढे कार्यक्रम आयोजीत केले जातात त्यामागचा उद्देश एकीचे बळ निर्माण करणे, जात-पात-धर्म-पंथ विसरून सर्वांनी भजन, कीर्तन, कव्वाली, भीम गितांसह अखंड महाराष्ट्रातल्या सर्वच कलांचा आस्वाद घ्यावा हा उद्देश असतो. तोच उद्देश धनंजय मुंडेंनी समोर ठेवला आणि कार्यक्रम आखला. मात्र काही दिवट्यांचे इथेच पोटसुळ उठले. मुंडेंच्या गणेशोत्सवातून आपले कुटील उद्देश सफल होत नाहीत हे लक्षात येताच त्यांनी लावणीसारख्या लोककलेवर अश्‍लीलता शोधली. लावणीला नृत्याचा एक कलात्मक दर्जा आहे. महाराष्ट्राच्या मातीतील महिला कलाकार तेही अंगभर कपडे घालून लावणी सादर करतात परंतु त्यात अशा लोकांना जर अश्‍लीलता दिसत असेल तर पुन्हा तेच गोरगरिबाची आणि सर्वसामान्यांची लावणी म्हणजे नाची आणि तुमची बिकनी म्हणजे हिरोईन ठरते काय! धनंजय मुंडेंच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमांना जिल्ह्यातच नव्हे तर राज्य आणि देशपातळीवर कौतुकास्पद चर्चीले जात असताना अशा चांगल्या उपक्रमांना जाणीवपुर्वक टार्गेट करत बदनाम करणे हा माध्यमांचा धर्म नव्हे. उलट अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून सर्वसामान्य जनतेचे मनोरंजन होत असेल, सर्वसामान्य त्यातून काही शिकत असेल, घेत असेल तर पोटसुळ उठणार्‍यांनी आपला जिथं जिरवायचा तिथं जिरवावा मात्र अशा विधायक कार्यात अश्‍लीलता न शोधता महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे.
कोरोना काळातले नाथ प्रतिष्ठाण आठवा
कोरोनासारख्या महामारीच्या काळात धनंजय मुंडेंच्या याच नाथ प्रतिष्ठाणने सैरावैर झालेल्या सर्वसामान्यांना सावरण्यासाठी अन्न-धान्य वाटले, कपडे वाटले, भाजीपाला दिला. पुणे-मुंबईवरून औषध मागवले. ते सर्वसामान्यांपर्यंत दिले. समाजामध्ये जिथे आनंदाच्या क्षणी नाथ प्रतिष्ठाण उत्सव करते तिथेच संकटाच्या काळी सर्वसामान्यांपर्यंत धावून जाते. आज केवळ धनंजय मुंडे यांनी कार्यक्रम आखला म्हणून काही माध्यमांनी त्या कार्यक्रमात अश्‍लीलता शोधणे म्हणजे स्वत:च्या बदमुर्खपणाचा देखावा लोकांसमोर मांडणे होय.

Previous Post

पंकजांनी घेतले फडणवीसांच्या गणेशाचे दर्शन, सत्तेतला प्रसाद मिळणार का?

Next Post

केवायसी करण्याची तारीख वाढवण्यात आली

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
अग्रलेख

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

by गणेश सावंत
July 22, 2026
अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
Next Post
केवायसी करण्याची तारीख वाढवण्यात आली

केवायसी करण्याची तारीख वाढवण्यात आली

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?