बीड (रिपोर्टर) संपुर्ण राज्यातील फार्मासिस्ट असोसिएशनची निवडणूक होत असून सदरील ही निवडणूक पोस्टल बॅलेट पेपरवर होणार आहे मात्र 40 ते 45 हजार मतदारांचे पत्ते चुकीचे असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अकरा वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच राज्य फार्मासिस्ट असोसिएशनची निवडणूक होऊ घातली आहे. सदर निवडणुकी-साठी मतदान पोस्टल बॅलेट पेपरवर होणार आहे. मात्र त्यापुर्वीच तब्बल 40 ते 45 हजार मतदारांचे पत्ते चुकीचे असल्याने बॅलेट पेपर मतदारांना पोहचणे अशक्य आहे त्यामुळे सदर निवडणूक रद्द करावी आणि नव्याने मतदार यादी जाहीर करून निवडणूक घ्यावी, अशी मागणी राज्यातील फार्मासिस्ट मतदारांनी केली आहे. सदरील निवडणूक पुढील 21 दिवस चालणार आहे मात्र त्यापुर्वीच एक मोठा घोळ समोर आला आहे. निवडणूक पोस्टल बॅलेट पेपरच्या माध्यमातून होणार आहे. परंतु यातील एक नव्हे दोन नव्हे चाळीस ते पस्तीस हजार फार्मासिस्ट मतदारांचे पत्ते चुकीचे असल्याचे उघड झाल्याने या निवडणुकीत गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.