अतिरिक्त रोजगार सेवक नेमणूक निर्णय रद्द करा
बीड (रिपोर्टर)ः- अतिरिक्त रोजगार सेवक नेमणूक निर्णय रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी रोजगार सेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये अनेकांचा समावेश आहे.
सध्या बीड जिल्ह्यात रोजगारच्या कामाची रेलचेल सुरू आहे. ही कामे ग्रामपंचायत मार्फत राबवणे आवश्यक असतांना काही हितसबंधी आणि प्रशासनाच्या मार्फत ठरावीक लोक गुत्तेदार पध्दतीने काम करत आहे. त्यामुळे चुकीचे काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांवर अनेकदा दडपण आणले जाते. काम करण्यास असमर्थता दर्शवल्यास खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात. बीड, पाटोदा,केज या तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांना केलेल्या कामाचे अनेकदा मागणी करुनही थकीत मानधन मिळाले नाही. ते देण्यात यावे अतिरिक्त रोजगार सेवक नेमणूक रद्द करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.