तपासात हलगर्जीपणा करणार्या पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी
बीड ; दि.25( प्रतिनिधी) पोलिस भरतीची तयारी करणार्या आरती धुरंदरे या मातंग समाजातील विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करुन, तिला अमानुष वागणूक देणार्या जातीयवादी आरोपीवर कठोर कारवाई करावी व तपासात हलगर्जीपणा करणार्या पोलिसाना बडतर्फ करण्यात यावी नसता येत्या दि.3 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबुराव पोटभरे baburaav potbhare यांनी दिला आहे.
बीड शहरात पोलिस भरतीची तयारी करणार्या आरती धुरंदरे या विद्यार्थिनीवर काही जातीयवादी गुंडानी धारदार शस्त्रानी दि.5 मे रोजी अमानुष हल्ला करुन, डोक्यापासून पायापर्यंतचे अवयव निकामी केले. सदर विद्यार्थिनी मृत्युशी झुंज देत असून, तिच्यावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबुराव पोटभरे baburav potbhare यांनी बुधवारी रुग्णालयात जावुन, पिडीत तरुणीच्या प्रकृतीची चौकशी केली. या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करणार्या जातीयवादी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, आरोपीना पाठिशी घालणार्या पोलिसाना बडतर्फ करण्यात यावे नसता दि.3 जून रोजी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाबुराव पोटभरे यांनी दिला आहे. याप्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांनी विशेष लक्ष घालावे, असेही बाबुराव पोटभरे यांनी सांगितले. यावेळी प्रशांत ससाणे, विनोद शिंदे, जयसिंग तांगडे आदीची उपस्थिती होती.