नेकनूर (रिपोर्टर) रक्त कमी आहे म्हणून एका रुग्णास नेकनूरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. संबंधित डॉक्टराने योग्य उपचार करण्याऐवजी बाहेरुन रक्त का आणले? असे म्हणत रुग्णांच्या नातेवाईकांशी अरेरावी केल्याने नातेवाईकांनी आपला रुग्ण थेट बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केला. दरम्यान या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालून अरेरावी करणार्या डॉक्टरविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पाटोदा येथून भरत चौधरी यांनी आपल्या नातेवाईक महिलेस प्रसुतीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात दाखल केले होते. महिलेस रक्त कमी असल्याने डॉ. शिवणीकर यांनी रक्त आणण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयात रक्त उपलब्ध नसल्याने बाहेरच्या लॅबमध्ये रक्त आणण्यात आले होते. बाहेरून का रक्त आणले? असे म्हणत डॉ. शिवणीकर यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी अरेरावी करत उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे नातेवाईकांनी आपला पेशन्ट बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केला. रुग्णाशी व नातेवाईकांशी अशा पद्धतीने व्यवहार डॉक्टर करत असेल तर अशा डॉक्टरविरोधात वरिष्ठ अधिकारी कारवाई का करत नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे.