कर्मचार्यांचा तुटवडा रुग्णांचे हाल, तर रुग्णालय परिसरात अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य
पात्रुड/(मुखीम इनामदार) तालुक्यातील पातुड हे गाव बाजारपेठेच्या मानाने खूप मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरतो व या गावांमध्ये आजूबाजूच्या ग्रामीण भागातील जवळपास 20 ते 25 खेड्यातील लोकांची वर्दळ या ठिकाणी असल्यामुळे येथे रुग्णालयाची संख्या देखील ग्रामीण भागाच्या मानाने चांगलीच असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे.
तालुक्यातील पात्रुड हे गाव खामगाव पंढरपूर महामार्गावर वसलेले असून या गावची लोकसंख्या देखील लक्षणीय आहे. या गावची ग्रामपंचायतव बाजारपेठ मोठी आहे. हे गाव मुख्य रस्त्यावर असल्यामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागातील जवळपास 20 ते 25 खेड्यातील लोकांची वर्दळ या ठिकाणी असते. काही खरेदी असो किंवा दवाखाना असो हे गाव नेहमी गजबजलेले असते आजूबाजूच्या खेड्यातील रुग्णांची संख्या व स्थानिकांची संख्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गर्दी करत असते. मात्र या ठिकाणी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचर जागा एकूण 5 असून यापैकी 3 रिक्त आहेत ए. एन. एम. एकूण जागा 6 असून 5 जागा रिक्त आहेत एम. पी. डब्ल्यू. एकूण जागा 5 पैकी रिक्त जागा 4 ए. एल. व्ही. एकूण जागा 1 पैकी रिक्त जागा 1 असून एकूण जागा जवळपास 13जागा रिक्त असून. पात्रुड या ठिकाणी आरोग्य केंद्रात महिन्याला 10 ते 12 महिला प्रसुती साठी येतात पात्रुड आरोग्य केंद्रात अंदाजे वार्षिक 100 ते 120 महिला प्रस्तुती होत असून. या ठिकाणी वार्षिक कुटुंब नियोजन अंदाजे 300 ते 400 महिलांची होते.
या ठिकाणी या आरोग्य केंद्रात दररोज 100 ते 150 पेशंट, रुग्ण दवाखान्यात येतात मात्र या ठिकाणी कर्मचार्यांची कमतरता असल्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळत नाही. व या आरोग्य केंद्रामध्ये कर्मचार्यांचा तुटवडा असल्यामुळे त्यांचे हाल होतात. या रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य असून अनेक वेळा विषारी साप देखील या ठिकाणी आढळून आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी मधुकर घुबडे यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
येथील तालुका आरोग्य अधिकार्यांना याबाबत अनेक तक्रारी करून देखील तालुका आरोग्य अधिकारी मधुकर घुबडे हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करत दुर्लक्ष करत असल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असून येथे येणार्या रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. वेळेवर कर्मचारी हजर राहत नसून रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत येथे कर्मचार्यांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना रुग्णसेवा देखील व्यवस्थित मिळत नाही. याबाबत अनेक वेळा आरोग्य अधिकारी मधुकर घुबडे यांना तक्रारी करून देखील ते या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. याबाबत समाजीक कार्यकर्ते नईम अतार यांनी फोनद्वारे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नाहीत व प्रतिसाद देत नाहीत. या गोष्टीकडे आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंडे साहेब लक्ष देतील का? पात्रुड आरोग्य केंद्रातील अस्वच्छतेचा प्रश्न व रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावून रुग्णांना न्याय देण्याचे काम करतील का? असा खोचक सवाल येथील गावकर्यांतून व रुग्णांमधून बोलले जात आहे.