Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडसत्तेचा गैरवापर केला म्हणणाऱ्या विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचे निकाल कळत नसतील तर ते...

सत्तेचा गैरवापर केला म्हणणाऱ्या विरोधकांना सर्वोच्च न्यायालयाचे निकाल कळत नसतील तर ते त्यांचे अज्ञान – अमरसिंह पंडितांचा विरोधकांना टोला

महाविकास आघाडीतील प्रत्येक शिलेदाराने ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई जिकिरीने लढली. प्रत्त्येक मतदारापर्यंत पोहचून आम्ही सर्वांनी काम केले. परंतु ऐनवेळी बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांवर मात्र या निकालाने नामुष्की आली आहे. ‘सहकार क्षेत्रातील यांना काही कळत नाही’ असं म्हणणाऱ्या विरोधकांना ना. मुंडे यांनी मुत्सद्दी खेळी करत चारी मुंड्या चित केले. सत्तेचा गैरवापर केला म्हणणाऱ्या माजी मंत्र्यांनी निबंधक, हायकोर्ट ते अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत खेटे घातले मात्र इथे जो निकाल दिला होता तोच निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम केला, तरीही विरोधक सत्तेच्या वापराचा राग आळवत असतील तर हे त्यांचे अज्ञान आहे, असा मिश्किल टोला माजी आ. अमरसिंह पंडित यांनी लगावला आहे. माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र या निवासस्थानी सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. संदीप भैय्या क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, प्रा. सुशीलाताई मोराळे, वाल्मिक अण्णा कराड, रामकृष्ण बांगर, भाऊसाहेब कराड, सतीश बडे यांसह आघाडीचे सर्वच नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. दरम्यान आ. प्रकाशदादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, बीड जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा शिरसाठ, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, काँग्रेस नेते दादासाहेब मुंडे, रामकृष्ण बांगर यांसह महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख नेत्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!