Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडजिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडीत - धनंजय मुंडे

जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडीत – धनंजय मुंडे

दरम्यान केवळ ८ जागांवर निवडणूक होत असताना देखील जिल्हा बँकेशी संलग्न मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. निवडणुकीवर बहिष्कार घालून, आपल्याच मतदारांवर अविश्वास दाखवत त्यांना राखण बसणाऱ्या भाजपची मक्तेदारी या निकालाने मोडीत निघाली असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. ना. मुंडे यांनी सर्वच नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय येणाऱ्या काळात घेतले जातील, असा विश्वासही ना. मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

अवघ्या काही तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या धनंजय मुंडे यांचा सूर्यभान मुंडे या जिवलग सहकाऱ्याच्या रूपाने जिल्हा बँकेतील प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या पाठोपाठ जिल्हा बँकेतील भाजपचे वर्चस्व मोडीत काढून धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले असल्याची चर्चा जिल्हाभरात आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!