शरद पवार, उद्धव ठाकरेंसह राज्यातल्या प्रमुख नेत्यांनी केले नेतृत्व
मुंबई (रिपोर्टर): छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणार्या भाजपाच्या नेत्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करा या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट महामोर्चा सुरू झाला असून या मोर्चाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. सदरचा मोर्चा हा रिचर्डस्न क्रुडस् मैदान येथून आझाद मैदान इथपर्यंत जाणार आहे. या मोर्चाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर संबोधित करणार आहेत. मोर्चासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
आज सकाळपासून रिचर्डस्न कृडस् मैदानावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते जमा होत होते. प्रत्यक्षात मोर्चा जेव्हा दुपारी 12 वाजता निघाला तेव्हा ही संख्या लाखोंच्या घरात पोहचली होती. शिवसेना खा. अरविंद सावंत, संजय राऊत, अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेस राहीत पवार, अमोल मिटकरी, काँग्रेसचे सचीन सावंत यांच्यासह अन्य नेत्यांनी मोर्चेकर्यांना सूचना केचल्या. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह आदी महापुरुषांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे नेते सातत्याने अवमानकारक वक्तव्य करतात या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते करत आहेत. आझाद मैदानावर हे सर्व नेते उपस्थित मोर्चेकर्यांना संबोधणार आहेत. मोर्चामध्ये राज्यभरातून लाखोंच्या संख्येने तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह शाहू-फुले-आंबेडकर यांचे अनुयायी उपस्थित आहेत.
संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही -उद्धव ठाकरे
ज्यांनी-ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जगानं हे दृश्य पहिल्यांदाच पाहिले. संयुक्त महाराष्ट्रासाठी असाच संघर्ष करावा लागला. बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर्व पक्ष एकटवलेत. फक्त महाराष्ट्र द्रोही आणि बाळासाहेबांचे विचार सोबत घेऊन जाणारे तोतये या महामोर्चा नाहीत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
बेताल वक्तव्ये करण्यामागचा मास्टरमाइंड कोण? -अजित पवार
बेताल वक्तव्ये करण्यामागचा मास्टरमाइंड कोण? राज्यपालांनी वक्तव्य केल्यानंतरही मंत्र्यांकडून वक्तव्ये सुरू. राज्यपालांनी माफी मागितली पाहिजे. भगतसिंह कोश्यारी यांना हटवले पाहिजे. वेळ पडली, तर कडक कायदा करावा. विधिमंडळ अधिवेशनात तशी मागणी करू. महाराष्ट्रातील गावे अचानक कर्नाटकात जाहीर केल्याचे का जाहीर करू लागले. याचे टुलकिट कुठून आले, असा सवालही अजित पवार यांनी केला. महामोर्चाला अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.