बीड (रिपोर्टर) आधुनिक युगात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर मात करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व रुजवणारे वैराग्यमूर्ती ह.भ.प. संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या महापूजेनिमित्त मागील सुमारे 20 वर्षांपासून मी श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे सातत्याने उपस्थित राहत आलो आहे. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी अपघात झाल्या मुळे रुग्णालयात उपचार घेत आहे डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिल्याने आज गडावर नसलो तरी मन गडावरच असल्याचे माजी मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटले . पुढे त्यांनी संत वामनभाऊंच्या चरणी माझे वंदन तसेच भाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गडावर येणार्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत हि केले.
माजी मंत्री धनंजय मुंडेंनी आज सोशल मीडियातून आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले कि . आधुनिक युगात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर मात करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व रुजवणारे वैराग्यमूर्ती ह.भ.प. संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या महापूजेनिमित्त मागील सुमारे 20 वर्षांपासून मी श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे सातत्याने उपस्थित राहत आलो आहे. मात्र काही दिवसांपूर्वी परळीत झालेल्या अपघातामुळे मी सध्या मुंबईत उपचार घेत असून, डॉक्टरांनी प्रवासास परवानगी नाकारल्याने इच्छा असूनही मी येऊ शकत नाही.संत वामनभाऊ व ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांच्यावर माझी निस्सीम श्रद्धा आहे. भाऊ-बाबांच्या कृपाशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या सदिच्छांमुळे मी त्या अपघातातून सुखरुप बचावलो, मी लवकरच भाऊंच्या दर्शनासाठी गडावर येईन. आज तनाने मी उपस्थित नसलो तरी माझे मन गहिनीनाथगडावरच आहे! संत वामनभाऊंच्या चरणी माझे वंदन तसेच भाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गडावर येणार्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत…