Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमनामलगाव जवळील जिनिंगला आग आगीत मोठ्या प्रमाणावर सरकी जळून खाक

नामलगाव जवळील जिनिंगला आग आगीत मोठ्या प्रमाणावर सरकी जळून खाक


बीड (रिपोर्टर):- बीडपासून काही अंतरावर असलेल्या नामलगाव येथील एका जिनिंगला आज सकाळी आग लागली. आग विझवण्यासाठी बीडच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. या आगीत जिनिंगमधील सरकी मोठ्या प्रमाणावर जळाली. वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे मोठी हानी टळली.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


नामलगाव येथील पीएस कॉटन ऑईल टेक इंडस्ट्रीज एलएलपी नावाची जिनिंग आहे. या जिनिंगला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत सरकी पेंड, मशिनरी यासह इतर साहित्य जळाले असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी बीड गेवराई अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

Most Popular

error: Content is protected !!