नवी दिल्ली (वृत्तसेवा):- 8 वर्षांनंतर अखेर कर सवलतीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर प्रणाली अंतर्गत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. 1 तास 27 मिनिटांच्या भाषणात गरिबांसाठी मोठी घोषणा त्यांनी केली. गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आणखी एक वर्ष सुरू राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. 50 नवीन विमानतळ आणि हेलिपॅडही बांधले जातील. तरुणांसाठी 30 आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वेच्या खर्चासाठी 2.40 लाख कोटी रुपये दिले आहेत. एमएसएमईला 9 हजार कोटींची क्रेडिट हमी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी 35 हजार कोटी रुपयांची हमी अशा मोठ्या घोषणा केल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा 5 लाख रुपये होती. त्याचबरोबर निर्मला सीतारामण यांनी नव्या टॅक्स लॅबमध्ये देखील मोठा दिलासा दिला आहे. या नव्या स्लॅबनुसार आता 2.50 लाख रुपयांहून 7 लाख रुपये करण्यात आलं आहे. या अर्थसंकल्पामुळे देशी किचनची चिमणी, परदेशातून येणारे सोने-चांदी, प्लॅटीनम सिगारेट महागणार आहेत. सिगारेटवरील आपतकालीन कर 16 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे तर दुसरीकडे काही मोबाईल, कॅमेर्यांचे लेन्स, इलेक्ट्रीक व्हिकल्स, एलईडी टीव्ही, बायोगॅस, खेळणी, सायकल, ऑटोमोबाईल स्वस्त होणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सलग पाचवा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर केला. पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच 2023-24 चा आर्थिक विकासाचा वेग 6 ते 6.8 टक्क्यांपर्यंत मर्यादीत राहील, असा अंदाज निर्मला सीतारामण यांनी वर्तविल्याने एकीकडे काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. आज सकाळी जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामण या लोकसभेत आल्या आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली तेव्हा विरोधकांनी भारत जोडोच्या घोषणा दिल्या. युपीआय कोवीन अॅपमुळे जगानं भारताचं महत्व मान्य केल्याचे त्यांनी छातीठोकपणे सांगत गेल्या नऊ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 9 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर विकसित झाल्याचे म्हटले. देशामध्ये तब्बल 102 कोटी नागरिकांचं पुर्ण कोविड लसीकरर झाल्याचं त्यांनी म्हटलं. पर्यटन व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा करून सर्वसमावेशक विकास शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविणं पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक क्षमताचा खर्या अर्थाने वापर करणे, हरित विकास तरुणांचं सामर्थ्य आणि आर्थिक क्षेत्र या सात विेषयांना अधिक महत्व देणार असल्याचे सांगून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करणार असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकर्यांना डिजिटल प्लॅटफार्म तयार करणार असल्याचे आश्वासन त्यांनी या अर्थसंकल्पात दिले. 63 हजार प्राथमिक कृषी क्रेडीट सोसायट्यांचं संगणकीकरण करणार असल्याचे सांगून मत्स्य विकासासाठी 6 हजार कोटींची विशेष तरतूद केल्याचे त्यांनी म्हटले. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी आयुष, मत्स्य, पशूपालन, डेअरी, सहकार अशा मंत्रालयांची स्थापना केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. पुढील तीन वर्षात तब्बल 38 हजार 700 शिक्षक कर्मचार्यांची भरती केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. ही भरती एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी केली जाणार आहे. पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीत 33 टक्के वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. 2.40 लाख कोटींची रेल्वेसाठी तरतूद केल्याचे सांगून सर्व शहरांमध्ये ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यासाठी मॅनहॉलचं रुपांतर मशीन होलमध्ये करणार असल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले. त्याचबरोबर देशात 50 विमानतळे उभारणार असल्याची घोषणा केली. देशामध्ये हाताने मैल उचलण्याची पद्धत बंद करणार असल्याचे सांगत मशीनद्वारे मैल उचलण्याची नवी योजना आणली जाणार आणि या योजनेची युद्धपातळीवर अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पॅन कार्ड संदर्भात घोषणा करताना पॅन कार्डचा वापर सरकारी संस्था आणि व्यवहारामध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केचली जाईल. त्यासाठी युनिफाईड फाईलिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. ईपोर्टस्च्या तिसर्या टप्प्यासाठी 7 हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगितले. फाईव्ह जी अॅपलीकेशनचा वापर करण्यासाठी देशभरातल्या इंजिनिअरींग संस्थांसाठी शंभर लॅबज्ची उभारणी करणार असल्याचे या वेळी म्हटले. हरित उर्जासाठी 35 हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगून नैसर्गिक खताच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम प्रणाम योजनेची त्यांनी घोषणा केली. 1 कोटी शेतकर्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार असून यासाठी 10 हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटरची स्थापना केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. क्रेडीट रिव्हॅम स्कीमसाठी 9 हजार कोटींची तरतूद, पंतप्रधान आवास योजनेच्या निधीमध्ये 66 टक्क्याने वाढ, ज्येष्ठ नागरिकांसाठी कमाल बचत मर्यादा 15 लाखांवरून 30 लाखावर वाढवल्याची घोषणा त्यांनी या वेळी करून 2025-26 आधी वित्तीय तुट जीडीपीच्या 4.5 टक्क्याच्या खाली आणण्याचा मानस त्यांनी या वेळी व्यक्त केला. देशात मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाल्याचे त्यांनी सांगून मोबाईल फोनच्या आयातीवर कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. तुरुंगात असलेल्या गरीब कैद्यांना जामीन मिळण्यासाठी आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा या वेळी करून काही वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा त्यांनी केली. सध्या 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्न असलेल्या नागरिकांना कुठलाही टॅक्स नाही आता ही मर्यादा सात लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगून नव्या कररचनेचा स्वीकार करणार्यांना ही पद्धत लागू असल्याचे सांगितले. नव्या करप्रणालीत बदल करताना अडीच लाखांपासून स्लॅब सुरू होते, नव्या कर प्रमाणालीनुसार तीन लाखांपर्यंत कोणताही कर नाही. तीन ते सहा लाकांपर्यंत पाच टक्के, सहा ते 9 लाखांपर्यंत 10 टक्के, 9 ते 12 लाखांपर्यंत 15 टक्के, 12 ते 15 लाखांपर्यंत 20 टक्के, 15 लाख ते त्याहून अधिकसाठी 30 टक्के कर भरावा लागणार आहे. 15.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त वार्षीक पगार असणार्या व्यक्तीला यातून 52 हजार रुपयांचा फायदा होणार असल्याचे म्हटले आहे. करावरील सरचार्ज 37 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचे सांगून बिगर सरकारी कर्मचार्यांना निवृत्तीवेळी सुट्ट्याच्या मिळणार्या रकमेमध्ये 25 लाखांपर्यंत करामध्ये सुट देण्यात आली आहे. सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली असून भारतीयांचं वार्षिक उत्पन्न वाढल्याचा त्यांनी दावा केला आहे.
टॅक्स स्लॅबमध्ये बदल
नव्या कर रचनेनुसार आता 6 स्लॅब असणार आहेत. याची सुरुवात 2.5 लाखांपासून सुरु होणार आहे. यापूर्वी या कर प्रणालीत 5 स्लॅब होते. यामध्ये आता तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नात कोणताही स्लॅब असणार नाही. सीतारामण यांच्या घोषणेनुसार, वैयक्तिक टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, 0-3 लाखांपर्यंत कोणताही स्लॅब असणार नाही. त्यानंतर 3-6 लाखांपर्यंत 5 टक्के तर 6-9 लाखांपर्यंत 10 टक्के, 9-12 लाखांपर्यंत 15 टक्के त्यानंतर 12-15 लाखांसाठी 20 टक्के आणि 15 लाखांच्यावर 30 टक्के अशी नवी कर रचना असणार आहे.
हे स्वस्त झाले….
काही मोबाईल फोन, कॅमेरांचा लेन्स स्वस्त झाले आहेत.
इलेक्ट्रीक व्हेईकल स्वस्त झाले आहेत. एलईडी टीव्ही,
बायोगॅसशी संबंधीत गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. खेळणी,
सायकल, ऑटोमोबाईल स्वस्त होणार
आहेत.
हे महागले…
देशी किचन चिमनी महागली आहे. परदेशातून येणारी सोने, चांदी, प्लॅटिनम महागले आहे. सिगारेट महागली आहे. सिगरेटवर आपत्कालीन कर आता 16 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.